Corona Update : औरंगाबादेत आज ४८ पॉझिटिव्ह, शहरातील ३२, ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश 

मनोज साखरे
Friday, 31 July 2020

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १३ हजार ८९० एवढी झाली आहे. त्यापैकी ९ हजार ९६१ बरे झाले असून ४६९ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सरकारी व खासगी रुग्णालय आणि विविध कोवीड सेंटरमध्ये सध्या ३ हजार ४६० जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. ३१) ४८ रुग्णांचे अहवाल सकाळच्या सत्रात पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ३२ व ग्रामीण भागातील १६ रुग्ण आहेत.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १३ हजार ८९० एवढी झाली आहे. त्यापैकी ९ हजार ९६१ बरे झाले असून ४६९ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सरकारी व खासगी रुग्णालय आणि विविध कोवीड सेंटरमध्ये सध्या ३ हजार ४६० जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

शहरातील बाधित ३२ रुग्ण  (कंसात रुग्ण संख्या) :

एन पाच, सिडको (१), हिलाल कॉलनी (१) राजीव गांधी नगर (१), शिवशंकर कॉलनी (७), मुकुंदवाडी (१), इंदिरा नगर, गारखेडा (१), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (१), रेल्वे स्टेशन परिसर (१), टाऊन हॉल, जय भीम नगर (२), राम नगर (१), मिसारवाडी (१), मेडिकल क्वार्टर, घाटी परिसर (१), दिल्ली गेट (१), खोकडपुरा (१), संत तुकाराम वसतीगृहाजवळ (१), शिवाजी नगर (२), कोटला कॉलनी (१), अन्य (१), बन्सीलाल नगर (३), पद्मपुरा (१), पडेगाव (२)    

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

ग्रामीण भागातील बाधीत १६ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) :

भगवान गल्ली, बिडकीन (१), अक्षयतृतीया अपार्टमेंट, बजाज नगर (१) सिडको महानगर एक, वाळूज (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), बिडकीन, पैठण (१), पाचोड, पैठण (१), पानवाडी, जातेगाव (१), बाजार गल्ली, फुलंब्री (५), देऊळगाव बाजार, फुलंब्री (१), महाल किन्होळा, फुलंब्री (३)

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  
कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण    -  ९९६१
उपचार घेणारे       -  ३४६०
आतापर्यंतचे मृत्यू  -  ४६९
एकूण बाधित        - १३८९०

Edited by Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update Today 48 positive