Coronavirus : औरंगाबादेत आज सकाळच्या सत्रात ६८ जण बाधित, आता ३ हजार २९५ रुग्णांवर उपचार

मनोज साखरे 
Tuesday, 14 July 2020

शहरात लॉकडाऊनचा आजचा पाचवा दिवस सुरु झाला आहे. आज (ता.१४) औरंगाबादेतील कोरोनाबाधितांची संख्या  सकाळच्या सत्रात मंदावली आहे. जिल्ह्यात ६८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ३ हजार २९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद : शहरात लॉकडाऊनचा आजचा पाचवा दिवस सुरु झाला आहे. आज (ता.१४) औरंगाबादेतील कोरोनाबाधितांची संख्या  सकाळच्या सत्रात मंदावली आहे. जिल्ह्यात ६८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ३ हजार २९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

जिल्ह्यातील चाचणी घेतलेल्या १ हजार ३२ स्वॅबपैकी ६८ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ८ हजार ८८२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ५ हजार २२९ बरे झाले असून ३५८ जणांचा मृत्यू झाला. आता ३२९५ जणांवर उपचार सुरु आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये  आज चार जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

शहरातील बाधित रुग्ण 
घाटी परिसर (३), शंभू नगर (१), सादात नगर (१), रमा नगर (१), शिव नगर (१), इटखेडा (३), राजाबाजार (१), जाधवमंडी (२), जटवाडा रोड (१), किराडपुरा (१),  दाना बाजार (१), एन दोन सिडको (१),  

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

ग्रामीण भागातील बाधित रुग्ण 
वाळूज (१), गणेश कॉलनी, सिल्लोड (१), बजाज नगर (१), मारवाडी गल्ली, लासूरगाव (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (५) स्वस्त‍िक नगर, बजाज नगर (१), हतनूर, कन्नड (१०), माळी गल्ली, रांजणगाव (१), दत्त नगर, रांजणगाव (१), मातोश्री नगर, रांजणगाव (१), आमे साई नगर, रांजणगाव (३), कृष्णा नगर, रांजणगाव (२), स्वस्तिक नगर, साजापूर (१), गणेश वसाहत, वाळूज (१), देवगिरी कॉलनी, रांजणगाव (२), बापू नगर, रांजणगाव (४), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (१), कमलापूर फाटा, रांजणगाव (१), अन्य (१), फर्दापूर, सोयगाव (६), जयसिंगनगर, गंगापूर (१), बोलठाण, गंगापूर (१), मारवाड गल्ली वैजापूर (१), कुंभार गल्ली, वैजापूर (३) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

कोरोना मीटर 

  • बरे झालेले रुग्ण - ५२२९
  • उपचार घेणारे रुग्ण -३२९५
  • एकूण मृत्यू - ३५८
  • आतापर्यंत बाधित - ८८८२

संपादन : प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad corona Update today 63 corona positive patient increase