esakal | Corona Update : औरंगाबादेत कोरोना मीटर सुरुच, आज ७० रुग्णांची वाढ, १२३१ रुग्णांवर उपचार 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus-graphic-web-feature.jpg

सकाळी ७० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार १०६  झाली. यापैकी १ हजार ७०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १६६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Corona Update : औरंगाबादेत कोरोना मीटर सुरुच, आज ७० रुग्णांची वाढ, १२३१ रुग्णांवर उपचार 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद :  औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून काल १०४ रुग्ण बाधित झाल्यानंतर आज (ता. १८) सकाळच्या सत्रात ७० जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. आता एकूण १ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण   

आज सकाळी ७० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार १०६  झाली. यापैकी १ हजार ७०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १६६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

आज आढळलेले रुग्ण : (कंसात रुग्ण संख्या)
घाटी हॉस्पीटल परिसर (१),  नॅशनल कॉलनी (१), सिंधी कॉलनी (१), पहाडसिंगपुरा (१),  न्यू हनुमान नगर (१), पडेगाव (१), लक्ष्मी कॉलनी (२), हर्सुल, जटवाडा (१), म्हसोबा नगर, मयूरपार्क (१), खोकडपुरा (३), जय भवानी नगर, गल्ली नं. चार (२), एन आठ सिडको (२), एन नऊ, सिडको (२), महू नगर (१), गजानन नगर, गल्ली नं. नऊ, गारखेडा (१), शिवाजी नगर, गारखेडा (१), एन बारा, हडको (१), कैसर कॉलनी (२), चिकलठाणा (१),  नंदनवन कॉलनी (२), मिसारवाडी (१), नूतन कॉलनी (२), गांधी नगर (१), मुकुंदवाडी (१), सेंट्रल जेल क्वार्टर्स परिसर (१), नागेश्वरवाडी (१), श्रीराम नगर (१), रामेश्वर नगर (१), न्यू विशाल नगर (१), आझाद चौक (३), पुंडलिक नगर (१), स्वामी विवेकानंद नगर (१), हरीकृष्ण नगर, बीड बायपास (१), श्रीविहान कॉलनी (१), शक्ती अपार्टमेंट (१),

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
गणेश कॉलनी (२), एमजीएम हॉस्पीटल परिसर (१), जाधववाडी, नवीन मोंढा (१), साई नगर, सिडको (१), टीव्ही सेंटर (१), सावित्री नगर, चिकलठाणा (१), बन्सीलाल नगर (१), औरंगपुरा (१), सुभाषचंद्र नगर, एन- अकरा (१), जय भवानी नगर, गल्ली नं. एक (१), रामदेव नगर (१), बजाज नगर (२), सावरकर कॉलनी, बजाज नगर (१), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (१), इंदिरा नगर, पंढरपूर (२), जय भवानी चौक, बजाज नगर (५), सिडको महानगर दोन (१) या भागातील  कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ३१ महिला व ३९ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.  

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

चार जण कोरोनाचे बळी 

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) १७ जून रोजी मध्यरात्री पाऊणे एकच्या सुमारास मृत्यू झाला.  जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ६० वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद शहरातील बायजीपुरा गल्ली क्रमांक २७ येथील ७५ वर्षीय पुरूष रुग्णाचा १७ जून रोजी सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने घाटीत आतापर्यंत १२२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १२१ मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. 
तसेच शहरातील खासगी रुग्णालयात कटकट गेट येथील ६५ वर्षीय स्त्री आणि अन्य एका खासगी दवाखान्यात श्रीराम नगराजवळील विश्वभारती कॉलनीतील ५६ वर्षीय स्त्री रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 
त्यामुळे आतापर्यंत घाटीत औरंगाबाद  जिल्ह्यातील १२१, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ४४, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण १६६  कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

कोरोना मीटर

  • बरे झालेले रुग्ण - १७०९
  • उपचार घेणारे रुग्ण - १२३१
  • आतापर्यंत मृत्यू     - १६६
  • आतापर्यंतचे एकूण बाधित - ३१०६