esakal | औरंगाबादेत बॅंकेला २६ लाखांचा गंडा, बनावट सोने तारण ठेवून फसवणूक 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News

आरोपींसह अन्य नऊ आरोपींनी देखील गोल्ड व्हॅल्युअर सचिन शहाणे याच्या मदतीने वेळोवेळी बनावट सोने तारण ठेवून २६ लाख २३ हजार ९०० रुपयाचे कर्ज उचलले.

औरंगाबादेत बॅंकेला २६ लाखांचा गंडा, बनावट सोने तारण ठेवून फसवणूक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : निशांत मल्टीस्टेट को- ऑप क्रेडीट सोसायटी लि. अकोलाच्या रेल्वेस्थानक रस्ता औरंगाबाद या शाखेत बनावट सोने ठेवून २६ लाख २३ हजार रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी शनिवारी (ता.३०) सायंकाळी आणखी दोघांना अटक केली. सचिन जगन्‍नाथ शहाणे (३५, रा.न्यू बालाजीनगर, मोंढा नाका), महादेव हरिश्‍चंद्र हिंगे (३३, रा.वसंत विहार, श्रेयनगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. संबंधित मल्टीस्टेटची शाखा रेल्वे स्थानक रस्त्यावर आहे. आरोपी महादेव हिंगे याने बनावट सोन्याच्या बांगड्या तारण ठेवून ७० हजार आणि दोन गंठन तारण ठेवून ४२ हजार रुपये असे सुमारे एक लाख १२ हजार रुपयांचे कर्ज घेतले.

औरंगाबाद- नगर रस्त्यावर नातेवाईकाकडे निघालेल्या दुचाकीस जोरदार धडक; महिला ठार, एक गंभीर जखमी

आरोपींसह अन्य नऊ आरोपींनी देखील गोल्ड व्हॅल्युअर सचिन शहाणे याच्या मदतीने वेळोवेळी बनावट सोने तारण ठेवून २६ लाख २३ हजार ९०० रुपयाचे कर्ज उचलले. सोन्याची गुणवत्ता तपासणीची जबाबदारी शहाणे यांची असताना देखील त्यांनी त्यात निष्काळजीपणा करून बनावट सोने बँकेत तारण ठेवून ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले असल्याचे संतोष शेषराव शेवाळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

‘मराठा समाजाला आरक्षण मिळत कसे नाही घेतल्याशिवाय राहणार नाही’ यासह विविध घोषणांनी अंबड दणाणले


पोलिस कोठडीत रवानगी 
संशयितांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, संशयितांना ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. दहातोंडे यांनी रविवारी (ता.३१) दिले. सुनावणी दरम्यान सहायक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. 

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

Edited - Ganesh Pitekar