ती पोलिस भरतीची तयारी करत होती, पण...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

औरंगाबाद : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या परभणीच्या एका तरुणीने औरंगाबाद शहरात आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. 11) सायंकाळी उघडकीस आली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार अंजली ईश्‍वर इंगळे (वय 21, रा. मूळ परभणी, ह.मु. विठ्ठलनगर, एन- दोन, सिडको) असे मृताचे नाव आहे. मूळची परभणीची असलेली अंजली भावासोबत शहरात राहत होती. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असून, भाऊ एका खासगी कंपनीत काम करतो. 

अंजलीने राहत्या खोलीत आत्महत्या केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक मुळे करीत आहेत. 

औरंगाबाद : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या परभणीच्या एका तरुणीने औरंगाबाद शहरात आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. 11) सायंकाळी उघडकीस आली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार अंजली ईश्‍वर इंगळे (वय 21, रा. मूळ परभणी, ह.मु. विठ्ठलनगर, एन- दोन, सिडको) असे मृताचे नाव आहे. मूळची परभणीची असलेली अंजली भावासोबत शहरात राहत होती. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असून, भाऊ एका खासगी कंपनीत काम करतो. 

अंजलीने राहत्या खोलीत आत्महत्या केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक मुळे करीत आहेत. 

वस्तऱ्याने तरुणावर वार 

औरंगाबाद : उसने पैसे देण्यास नकार दिल्याने एकाने तरुणावर वस्तऱ्याने वार केला. ही घटना शनिवारी (ता. 11) दुपारी एकच्या सुमारास पैठण गेट येथे घडली. याबाबत शेख फैयाज शेख युनूस (वय 22) याने तक्रार दिली. त्यानुसार अप्पू कुरेशी असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

रेल्वे प्रवाशाचे तीस हजार लंपास 

औरंगाबाद : रांजणी येथे रेल्वेने जाण्यासाठी रेल्वेत चढताना एकाने प्रवाशाचे तीस हजार रुपये लंपास केले. ही घटना शनिवारी (ता. 11) मुकुंदवाडी रेल्वेस्थानक येथे सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. 

याबाबत कैलास मन्नू राठोड (रा. हनुमाननगर) यांनी तक्रार दिली. ते सकाळी साडेसातला स्थानकातून रेल्वेत चढत होते. त्यावेळी तिघे त्यांच्या पॅंटच्या मागील खिशातून तीस हजार रुपये हिसकावत असताना त्यांच्या लक्षात आले.

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

रेल्वेत चढण्याऐवजी ते खाली उतरले व त्यांनी चोरांचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी हाताला हिसका देऊन चोर पसार झाला. याबाबत राठोड यांनी तक्रार दिली. त्यानुसार पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

एसटी बसला कारची धडक 

औरंगाबाद : एसटी बसला कार धडकल्याची घटना जळगाव रस्त्यावर शनिवारी (ता. 11) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. याबाबत शिवराज बाबूराव व्हरकटे यांनी तक्रार दिली. त्यानुसार कारची (एमएच 20, ईई 5018) धडक एसटी बसला बसली.

यात बससह कारचेही नुकसान झाले. कारमधील व्यक्तीही जखमी झाली, अशी व्हरकटे यांनी तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

भांडण सोडविण्यास गेलेल्याला मारहाण 

औरंगाबाद : भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाला एकाने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (ता. दहा) सायंकाळी साडेसातच्या सुमारास नारेगाव येथे घडली. किरण मनोहर वाघ (रा. नारेगाव) याने तक्रार दिली.

गणेश पोले, गणेश पोलेचे वडील व त्याचा भाऊ यांचे एका व्यक्तीशी भांडण सुरू होते. किरण हे भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी गणेश पोले याने किरणवर चाकूने वार केला. याप्रकरणी गंभीर जखमी होईल अशी मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

गणेश कॉलनीतील मुलगा बेपत्ता 

औरंगाबाद : गणेश कॉलनीतील शेख अन्सार शेख फारूक (वय 17, रा. गणेश कॉलनी) हा तीस डिसेंबरला बेपत्ता झाला. याबाबत त्याच्या नातेवाइकांनी सिटी चौक ठाण्यात तक्रार दिली. सावळा रंग, पाच फूट उंची असे त्याचे वर्णन आहे.

त्याला हिंदी व उर्दू भाषा येत असून, तो बोबडा बोलतो. त्याची माहिती असल्यास 0240-2240551 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिटी चौक पोलिसांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Crime News Suicide Theft News