वाचा ! ग्रामीणमध्ये किती लोकांची अँटीजेन टेस्ट, किती जणांना झाला कोरोना.  

दुर्गादास रणनवरे
Sunday, 20 September 2020

ग्रामीणमध्ये भागात अँटीजेन किटच्या माध्यमातून ५४ हजार तपासण्या, तर 
तर आरटीपीसीआरच्या २७ हजार ७७२ तपासण्या झाल्या यातून आलेले पॉझिटिव्ह व बरे झालेले रुग्णांचा तपशील वाचा सविस्तर. 

औरंगाबाद : जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या २७ हजार ७७२ तर अँटीजेन किटच्या माध्यमातून ५४ हजार १३० तपासण्या करण्यात आल्या आहेत. आणखी ३० हजार अँटीजेन किट उपलब्ध झाल्या असुन बाजाराच्या मोठ्या गावांत तसेच जिथे जास्त लोकांचा संपर्क येतो अशा ठिकाणी तपासणीवर भर दिला जाणार असल्याचे स्थायी समितीच्या शुक्रवारी (ता.१८) झालेल्या च्या बैठकीत प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी सांगितले . 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्हात ५९ कोव्हीड केअर सेंटरच्या माध्यमातून आठ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली असुन त्यापैकी आवश्यकतेनुसार केवळ २२ कोव्हीड केअर सेंटरच्या ६ हजार २९० खाटांपैकी एक हजारापेक्षाही कमी खाटांचा वापर सध्या होत आहे. बहुतांश रुग्ण शहरी भागात उपचार घेत असल्याचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी सांगितले. जिल्हा वार्षीक योजना २०१९-२० मध्ये एक कोटी ४० लाख रुपये प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा वाढवणे, औषध यंत्रसामुग्री खरेदीसाठी मंजुर आहे. तर उपकरातून ४५ लाख रुपये मंजुर असुन त्याची खरेदी प्रक्रीया सुरु आहे. जिल्हा वार्षीय योजनेतून २०२०-२१ मधुन ४ कोटी ५३ लाख ४० हजार रुपये तातडीच्या उपाययोजनांसाठी मिळाले. त्यापैकी आतापर्यंत ९० हजार अँटीजेन किट खरेदी करण्यात आल्या असुन आवश्यकतेनुसार खरेदीप्रक्रीया सुरु असल्याचेही डॉ.गंडाळ यांनी स्पष्ट केले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोनामाहितीसाठी स्वतंत्र हेल्प लाईन तयार करावी : केशव तायडे 
ग्रामीण भागातील रुग्णांना कोरोनविषयक माहितीच मिळत नसल्याने मोठ्या अडचणी निर्मण होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आपली स्वतंत्र हेल्प लाईन तयार करावी आणि त्यासाठी काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी सदस्य केशव तायडे यांनी केली. जिल्ह्यात कोणत्या भागात किती बेड शिल्लक आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑक्सिजन बेड कुठे आहेत आदी महिती या हेल्प डेस्कच्या माध्यमातून रुग्णांना देता येऊ शकते असेही तायडे यांनी सांगितले. तर आरोग्य विभागावर जास्तीत जास्त नागरिकांचा विश्वास संपादन केला पाहिजे असे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड म्हणाले. रमेश पवार यांनी ऑनलाईन माध्यमातून ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या आणि रुग्ण कल्याण समिती आणि त्यासाठी मिळालेला निधी उ किती खर्च झाला आदी प्रश्न उपस्थित केले असता डॉ. गंडाळ यांनी सविस्तर माहिती सभागृहाला दिली.

Edit - Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad District Corona Update with an antigen test