बाप रे..! औरंगाबादेत ईडीची कारवाई; ७ किलो सोने, ६२ लाख जप्त, वाचा सविस्तर कशी झाली कारवाई..

प्रकाश बनकर
Thursday, 30 July 2020

  • औरंगाबादेत मोठ्या केटरिंग व्यवसायिकावर ईडीची कारवाई
  • घरी व कार्यालयावर एकाच वेळी छापा; १२ अधिकाऱ्यांचा समावेश

औरंगाबाद : औरंगाबादेतील केटरिंगचा व्यवसायाची संबंधित असलेल्या व्यापाऱ्यावर गुरुवारी (ता.३०) अंमलबजावणी संचालनालयतर्फे (ईडी) ने परकीय चलन (फॉरेन एक्सचेंज)च्या बेकायदेशीर व्यवहाराच्या संशयावरुन छापा टाकला. एकाच वेळी घर आणि कार्यालय अशा तीन ठिकाणी छापा टाकून तब्बल ७ किलो सोने आणि ६२ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसे ट्विट ईडीने आपल्या अधिकृत हॅण्डवरुन केले आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

ईडीची मुंबई येथुन आलेल्या बारा अधिकाऱ्यांच्या टीमतर्फे सकाळी सहा वाजेपासून ही कारवाई केली जात होती. याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत आली. काही दिवसापासून या व्यापारा विषयी गुप्त पद्धतीने माहिती काढण्यात येत होती. यावर संशय बळावल्याने मुंबईतील विशेष पथक पहाटे तीन वाजता औरंगाबादेत दाखल झाले. एका अधिकार्याने संबंधित कॅटरिंगचे कार्यालय ईडीच्या अधिकाऱ्यांना दाखवले. सकाळी सहा वाजेपासून या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईत आर्थिक व्यवहार संबंधित महत्त्वाचे दस्तावेज, बिले, कागदपत्राची तपासणी केली जात आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

त्या व्यापार्याची संबंधित असलेल्या कार्यालयात अधिकाऱ्यांनी प्रवेश नाकारला. या कारवाई विषयी ईडीच्या अधिकाऱ्यांची बोलण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी यावर बोलणे टाळले. कारवाई करणारे अधिकारी हे केरळ व वेगवेगळ्या राज्यातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

गेल्या वर्षी मोठ्या उद्योग समूहावर झाली होती कारवाई
मनी लॉन्ड्रींग प्रकरणी शहरातील जालना रोड येथील कार्यालयावर शहरातील एका उद्योग समूहावर  अंमलबाजवणी संचालनालयाने (ईडी) मार्च २०१९ मध्ये कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर ही दुसरी मोठी कारवाई आहे.

(संपादन : प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad ED Raid illegal exchange of foreign currency