esakal | धनगर आरक्षणासाठी २२ ऑक्टोंबरला औरंगाबाद ते जालना 'मानवी साखळी'
sakal

बोलून बातमी शोधा

0000Dhangar.jpg

या अधिकारासाठी गुरुवारी (ता.२२) औरंगाबाद ते जालना मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी पत्रकार परीषदेत दिली.

धनगर आरक्षणासाठी २२ ऑक्टोंबरला औरंगाबाद ते जालना 'मानवी साखळी'

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : घटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर असलेली ‘धनगड’ हीच महाराष्ट्रातील धनगर जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक दस्ताऐवजातून सिद्ध झाले आहे. परंतू शासनाच्या उदासिनतेमुळे ६५ वर्षापासून धनगर समाज अधिकारापासून वंचित आहे. या अधिकारासाठी गुरुवारी (ता.२२) औरंगाबाद ते जालना मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी पत्रकार परीषदेत दिली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
यावेळी शेवाळे म्हणाले, की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देणार अशा वल्गना करुन समाजाला धोका दिला. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी एक दिवसाचे स्वतंत्र अधिवेशन घेऊन धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. परंतू, आता त्यांचे सरकार सत्तेवर असल्याने आरक्षणाबाबतचा ठराव तातडीने मंत्रीमंडळात घेऊन तसा अभिप्राय केंद्र सरकारकडे पाठवावा. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या मागणीसाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता फलोत्पादन व रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांच्या सुतगिरणी चौकातील निवास स्थानापासून ते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन नाका, जालना येथील घरापर्यंत तब्बल ६० किलोमीटरची धनगर आरक्षण मानवी साखळी तयार केली जाईल. त्यात आरक्षण आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहे. याच दिवशी राज्याच्या इतर जिल्ह्यातील धनगर समाज अर्ध जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे लहु शेवाळे यांनी सांगीतले. यावेळी धनगर आरक्षण अॅक्शन कमिटीचे समन्वयक विठ्ठलराव खडके, काशीनाथ आरगडे, नाना साबळे, सोन्याबापू गावडे, दिगंबर खंडागळे, विठ्ठल कोरडे आदींची उपस्थिती होती. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(Edited By Pratap Awachar)