म्हणून.. या डॉक्टरवर झाला गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

डॉक्टरविरुद्ध जातीय तेढ निर्माण केली म्हणून गुन्ह्याची नोंद केली. देशात सध्या कोरोनाचे महासंकट आहे. अशा स्थितीत कोरोनासंबंधी कोणतीही आक्षेपार्ह किंवा अफवा पसरवणारे पोस्ट करू नये असे आदेश असतानाही डॉक्टरने अशा आशयाची पोस्ट केली, त्यामुळे ही पोस्ट त्यांच्या अंगलट आली आहे. 

औरंगाबाद - फेसबुकवर तबलिगीसंबंधित आणखी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या औरंगाबादेतील एका डॉक्टरविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात रविवारी (ता. पाच) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, संभाजी गोविंद चितळे (वय ३८, रा. मायानगर, सिडको-दोन) असे या डॉक्टरचे नाव आहे. ते कान-नाक-घसा डॉक्टर आहेत.

औरंगाबाद मौलाना साद यांनी दिल्ली येथे घेतलेल्या तबलिगी जमात कार्यक्रमामुळे कोरोना भारत देशात पसरला, असे म्हणून त्यांच्यासंबंधी आक्षेपार्ह मजकूर डॉक्टरने फेसबुकवर पोस्ट केला.

ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर रामदास सोनवणे यांनी यासंबंधी तक्रार दिली. आक्षेपार्ह पोस्ट सार्वजनिक ठिकाणी पसरविली, त्यामुळे एखाद्या वर्गातील किंवा समाजातील व्यक्तींना दुसऱ्या कोणत्याही वर्गाविरुद्ध किंवा समूहाविरुद्ध कोणताही अपराध करण्यास, चिथावणी देण्याच्या उद्देशाने त्यांनी सदरचे कृत्य केल्याचे पोलिसांना दिसून आले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

त्यामुळे त्यांनी या डॉक्टरविरुद्ध जातीय तेढ निर्माण केली म्हणून गुन्ह्याची नोंद केली. देशात सध्या कोरोनाचे महासंकट आहे. अशा स्थितीत कोरोनासंबंधी कोणतीही आक्षेपार्ह किंवा अफवा पसरवणारे पोस्ट करू नये असे आदेश असतानाही डॉक्टरने अशा आशयाची पोस्ट केली, त्यामुळे ही पोस्ट त्यांच्या अंगलट आली आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक कर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Koronavirus News Offence Registered Against Doctor