esakal | अभियंत्यांनो सावधान ! वीज जोडणीस कुचराई केली तर नुकसान भरपाई तुमच्याकडूनच घेईल
sakal

बोलून बातमी शोधा

gite.jpg

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री डॉ. नरेश गिते यांनी दिला इशारा. 

अभियंत्यांनो सावधान ! वीज जोडणीस कुचराई केली तर नुकसान भरपाई तुमच्याकडूनच घेईल

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : औद्योगिक वीज ग्राहकांनी ए-वन फॉर्म भरला असेल किंवा मैत्री पोर्टलवर वीज जोडणीची मागणी केली. मात्र वीज जोडणीस विलंब झाल्यास संबधित अभियंत्यांवर जबाबदारी निश्चीत करून महावितरणचे झालेले नुकसान वसूल करण्याचा इशारा महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी दिला आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडळातील औघोगिक प्रलंबित वीज जोडण्याबाबत सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी व्हीडीओ कॉन्फर्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी कामचुकार आणि निष्काळजीपणा करणाऱ्या अभियंत्यांना थेट इशारा दिला. डॉ. नरेश गिते बोलतांना म्हणाले की, औघोगिक वीज ग्राहक महावितरणकडे मैत्री पोर्टलद्वारे अर्ज करून त्या सोबत आवश्यक कागदपत्रे सादर करीत असतात. अशा अर्जांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्या बाबतची तांत्रिक मंजुरी दिल्यानंतर संबंधित ग्राहकास कोटेशन प्रदान करण्यात येते. व ग्राहकाने कोटेशनची रक्क्म भरल्यानंतर वीज जोडणी दिली जाते. या सर्व प्रक्रीया जलदगतीने राबवून ग्राहकास तात्काळ वीज जोडणी द्यावी. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वीज ग्राहकांनी मैत्री पोर्टलवर अर्ज केल्यानंतर वीज जोडणीसाठी संबंधित अभियंते जेवढा विलंब करतील, त्या प्रमाणे ग्राहकाच्या वीज बिलाच्या प्रमाणात संबंधित अभियंता, कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच औघोगिक वीज ग्राहकांनी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केले असल्यास पुरेशा कागदपत्राअभावी अर्ज रद करून नये म्हणून संबंधित ग्राहकांशी संपर्क व पाठपुरावा करून कागदपत्रांची पूर्तता व वीज शुल्क भरून घेवून तात्काळ वीज जोडणी दयावी असे त्यांनी स्पष्ट केले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठवाडयातील औद्योगिक सर्व प्रलंबित वीज जोडण्या एका महिण्याच्या आत देण्यात याव्यात त्याचप्रमाण पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणच्या प्रलंबित घरगुती, व्यापारी व औघोगिक वीज जोडण्या तात्काळ देण्याचे निर्देश डॉ. गित्ते यांनी दिले. या व्हीडीओ कॉन्फर्सिंग आढावा बैठकीला औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता दतात्रय पडळकर, तसेच सर्व अधिक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

(संपादन-प्रताप अवचार)