शिवसेनेसाठी खुशखबर : औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकलली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्तांनी आज मुंबईत याची घोषणा केली. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूकही आपसूकच पुढे ढकलली गेली आहे. 

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्तांनी आज मुंबईत याची घोषणा केली. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूकही आपसूकच पुढे ढकलली गेली आहे. 

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. राज्यातील कोरोनाचा वाढचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आज (ता.17) आहे त्या टप्प्यांवर स्थगित केले आहेत.

खैरे म्हणतात, मी मरेपर्यंत....

राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या पथ्यावर

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक तीन महिने लांबणीवर टाकण्याचा हा निर्णय शिवसेनेच्या पथ्यावर पडणार आहे. राज्य शासनाने रस्त्यांसाठी नुकताच दिलेला १५२ कोटींचा निधी, १६८० कोटींची नवी पाणीपुरवठा योजना, सफारी पार्क अशी शहरातील अनेक विकासकामे पाइपलाइनमध्ये असून, या कामांचा नारळ फोडण्याची संधी सत्ताधाऱ्यांना मिळणार आहे. दुसरीकडे इच्छुकांचा खर्च मात्र वाढणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation Election Postponed Breaking News