गाळेधारकांनो सावधान ! महापालिकेची ९० जणांना नोटीस.  

माधव इतबारे
Wednesday, 7 October 2020

९० गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, यातील काहींचे भाडे कराराचे नूतनीकरण केले जाणार आहे तर काही जणांकडून थकबाकी वसूल केली जाणार आहे. 

औरंगाबाद : कराराची मुदत संपल्यानंतरही नूतनीकरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व भाड्याची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ९० गाळेधारकांना महापालिकेच्या मालमत्ता विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
मालमत्ता अधिकारी अपर्णा थेटे यांनी सांगितले की, महापालिकेचे शहरात विविध ठिकाणी व्यावसायिक ५४७ गाळे असून, ते भाडे करारावर देण्यात आले आहेत. त्यापैकी रिकामे असलेल्या ८८ गाळयांसाठी निविदा काढून ते भाडेतत्वावर देण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. त्यांपैकी ३६ गाळे भाडे करारावर देण्यात आले आहेत.

दरम्यान गाळे भाडे करारावर घेतल्यानंतर अनेकांनी कराराचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे अशा गाळेधारकांना नोटीस बजावून भाडे कराराचे नूतनीकरण करून घेण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. ९० गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, यातील काहींचे भाडे कराराचे नूतनीकरण केले जाणार आहे तर काही जणांकडून थकबाकी वसूल केली जाणार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्राणिसंग्रहालयात आता सीसीटीव्हीचा वॉच 
 महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहेत. वन्य जीव सप्ताहानिमित्त मंगळवारी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी कॅमेऱ्यांचे उद्घाटन केले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महानगरपालिकेतर्फे सिध्दार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयात वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार विविध उपक्रमांचे उद्घाटन मंगळवारी प्रशासकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, बी. बी. नेमाने, प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांची उपस्थिती होती. यावेळी प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमासाठी डॉ. शाहेद शेख, संजय नंदन, रावसाहेब जावळे, सुनील लांडगे, रोहित देशमाने, सुभाष शेळके यांनी पुढाकार घेतला. महाहापालिकेने मिटमिटा भागात सफारी पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. सफारी पार्कसाठी स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. सफारी पार्कचे भूमिपूजन महिनाभरात अपेक्षित असल्याचे यावेळी आयुक्त श्री. पांडेय यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation News