औरंगाबादेत 'टीडीआर' मध्ये डबल गेम ! 

माधव इतबारे
Tuesday, 11 August 2020

मोबदला घेतला पण जागा अद्याप मूळ मालकाच्या ताब्यातच 
नगररचनाच्या पथकांकडून स्थळ पाहणी, बारा जणांची नियुक्ती 

औरंगाबाद : महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी टीडीआर (हस्तांतरित विकास हक्क) प्रकरणांचा अहवाल मागविताच नगररचना विभाग कामाला लागला आहे. अनेकांनी टीडीआरचा मोबदला घेतला मात्र जागा ताब्यात दिलेल्या नाहीत. त्यामुळे स्थळ पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांपासून नगर रचना विभागातील बारा जणांच्या पथकांकडून पाहणी सुरू करण्यात आली आहे. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

महापालिकेतील टीडआर घोटाळा विधीमंडळात गाजला होता. त्यानंतर शासनाने चौकशीची घोषणा केली. चौकशी पूर्ण झाली असली तरी त्यात काय दडले आहे हे समोर आलेले नाही. दरम्यान, आमदार अंबादास दानवे यांनी टीडीआरच्या विषयावर प्रशासक पांडेय यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी संपूर्ण टीडीआर प्रकरणांचा अहवाल सादर करण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले आहेत. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

त्यानुसार नगररचनाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन यांनी स्थळ पाहणीसाठी सहा स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. यात बारा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दोन दिवसांपासून ही पथके स्थळपाहणी करीत आहेत. महापालिकेत सध्या अडीचशेपैकी निम्म्याच फाईली उपलब्ध आहेत. उर्वरित फायली उपसंचालक कार्यालयाकडे असल्याने त्या मागवून घेण्याचे आदेश श्री. पांडेय यांनी दिले आहेत. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

टीडीआरची बदनामीच जास्त  
बहुतांश महापालिकांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने रोख मोबदला देणे अवघड होते. परिणामी आरक्षणातील जागा ताब्यात घेण्यास विलंब होतो. भूसंपादन रखडते. त्यामुळे टीडीआरचा विषय समोर आला. संबंधित व्यक्तीला त्याचे प्रमाणपत्र दिले जाते. त्याआधारे संबंधित व्यक्ती शहरातील इतर कोणत्याही भागात तिच्याकडील दुसऱ्या जागेवर तेवढे अतिरिक्त बांधकाम करू शकते. हे हक्क हस्तांतरणीय असल्याने त्याची दुसऱ्याला विक्रीही करता येते. मात्र टीडीआरच्या उपयोगाऐवजी बदनामीच जास्त झाली आहे. 

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

२००८ पासून सुरुवात 
महापालिकेने २००८ पासून टीडीआर स्वरूपातही मोबदला देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आत्तापर्यंत महापालिकेच्या नगररचना विभागाने अडीचशेहून अधिक जागांचे टीडीआर दिले आहेत. काही प्रकरणात बोगस टीडीआर दिल्याचे आरोप झाल्याने श्री. पांडेय यांनी स्थळ पाहणीचे आदेश दिले आहेत. 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

 

महापालिकेकडून टीडीआर स्वरूपात मोबदला घेतल्यानंतरही या जागा मूळ मालकांच्याच ताब्यात आहेत, त्यामुळे स्थळपाहणीचे आदेश दिले आहेत. संबंधित जागा ताब्यात घेण्याची कारवाई महापालिकेतर्फे केली जाईल. 
आस्तिककुमार पांडेय, मनपा प्रशासक 

‘‘सर्व झोनमध्ये स्थळपाहणीसाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रकरणे जास्त असल्यामुळे वेळ लागणार आहे. स्थळ पाहणी पूर्ण झाल्यानंतर आठवडाभरात प्रशासकांना अहवाल सादर केला जाईल. 
रामचंद्र महाजन, साहाय्यक संचालक, नगर रचना विभाग 

Edit-Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation news TDR Double game