औरंगाबादेत आता नळांना मीटर; पुण्याच्या कंपनीचा आराखडा 

माधव इतबारे
Friday, 16 October 2020

स्मार्ट सिटी : डीपीआर होणार सादर 

औरंगाबाद : शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम करतानाच नळांना स्मार्ट सिटी योजनेतून मिटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम पुणे येथील ब्लू स्ट्रीम कंपनीला देण्यात आले आहे. त्यानुसार कंपनीने कामाला सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
समांतर पाणी पुरवठा योजनेत शहरातील नळांना मीटर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र मीटरच्या किमतीवरून त्यावेळी मोठा वाद झाला व नंतर महापालिकेने योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतरच नळांना मिटर बसविण्यात येतील. तसेच नळधारकांना बाजारातून मिटर घेण्याची मुभा असेल, असे स्पष्ट केले होते. दरम्यान समांतर पाणी पुरवठा योजनाच गुंडाळण्यात आल्याने नळांना मिटर बसविण्याचा विषय मागे पडला. आता शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजनेची निविदा अंतिम टप्प्यात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या योजनेत नळांना मिटर बसविण्याची तरतूद नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीचा निधी वापरून नळांना मिटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मार्ट सिटीच्या स्मार्ट वॉटर उपक्रमाअंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर, नाशिकसह अनेक शहरांनी नळांना मीटर बसवले आहेत. त्याच धर्तीवर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. डीपीआर तयार करण्याचे काम पुण्याच्या ब्लू स्ट्रीम कंपनीला देण्यात आले असून, कंपनीने काम सुरू केले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बेकायदा नळ शोधणार का? 
शहरातील बेकायदा नळांचा विषय गाजत आहे. अधिकृत नळांची संख्या एक लाख ४० हजारपर्यंत असून, यात व्यावसायिक नळांची संख्या केवळ १,९२८ आहेत. सुमारे लाखभर बेकायदा नळ असण्याचा अंदाज प्रशासनातर्फेच वांरवार व्यक्त केला जातो. त्यामुळे नळांना मिटर बसविताना बेकायदा नळांचा शोध घेतला जाणार का? त्यानुसार सर्व्हेक्षण केले जाणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation smart city project