बाप रे! दोन हजार कुत्र्यांना मारणार हे लोक...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

श्‍वान दुर्धर आजाराने त्रस्त आहेत. ते रोगामुळे आक्रमक झालेले दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका वाढला आहे. दुरुस्त न होणाऱ्या श्‍वानांना दयामरण देण्याचे पाऊल उचला, नियोजन करा, अशीही सूचना महापौरांनी केली आहे.

औरंगाबाद- शहरातील श्‍वानांची वाढती संख्या कमी करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. आजघडीला तब्बल 40 हजार श्‍वान शहरात असून, यातील दुर्धर आजार झालेले, पिसाळलेले श्‍वान लहान मुले, वृद्धांवर हल्ले करीत आहेत. सध्या अशा श्‍वानांची संख्या तब्बल दोन हजारांच्या घरात आहे. त्यांना दयामरण देण्याचा विचार महापालिका प्रशासनातर्फे सुरू आहे.

शनिवारी (ता.24) यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. दरम्यान, मोकाट श्‍वानांना अटकाव घालण्याच्या उपाययोजनांवरून महापौरांनी संताप व्यक्त केला. 

शहरातील श्‍वानांची वाढती संख्या कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे गेल्या काही वर्षांपासून निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. आजघडीला शहरात श्‍वानांची संख्या सुमारे 40 हजारांच्या घरात गेली आहे.

शहरातील चौक, मुख्य रस्ते, मांस विक्रीची दुकाने असलेल्या भागात मोकाट श्‍वानांच्या टोळ्या फिरतात. मोकाट श्‍वान वारंवार लहान मुले, वृद्धांवर हल्ले करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या मोकाट श्‍वानांवर नियंत्रण मिळवणे आता महापालिकेला अवघड झाले आहे.

वाचा ः वीर्यदानानेही गर्भधारणा होत नाही... हा आहे पर्याय

महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी (ता.24) पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी नाईकवाडे यांनी सांगितले, की महापालिकेने नेमलेल्या होप ऍनिमल संस्थेकडून 20 ते 25 श्‍वानांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत; मात्र महापौरांनी या आकडेवारीवर आक्षेप घेतला.

प्रत्यक्षात याहीपेक्षा कमी श्‍वानांचे निर्बीजीकरण होत असल्याचे सांगत महापौरांनी संताप व्यक्‍त केला. मोकाट कुत्र्यांमुळे शहरात नागरिकांच्या जिवाला धोका असताना पालिका तोकड्या उपाययोजना राबवीत असल्याचे सांगत महापौरांनी खरडपट्टी काढली.

वाचा - या कारणांनी खालावत आहे शुक्राणूंची गुणवत्ता  

अनेकांना संसर्गजन्य रोग झाले आहेत. काही श्‍वान दुर्धर आजाराने त्रस्त आहेत. ते रोगामुळे आक्रमक झालेले दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका वाढला आहे. दुरुस्त न होणाऱ्या श्‍वानांना दयामरण देण्याचे पाऊल उचला, नियोजन करा, अशीही सूचना महापौरांनी केली आहे. 
 
असे आहेत नियम 
दयामरण देण्यासाठी महापालिकेने समिती नियुक्त केली आहे. या समितीने दयामरणाची शिफारस केल्यानंतरच श्‍वानाला मारले जाते. शहरात दुर्धर आजार असलेले सुमारे दोन हजार श्‍वान असावेत, असा अंदाज डॉ. नाईकवाडे यांनी व्यक्त केला. 

क्लिक करा - घाटीत पुन्हा तोडफोड, डॉक्टरला...  

लवकरच निविदा प्रक्रिया 

श्‍वानांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी सध्या होप संस्थेला काम देण्यात आले आहे. या निविदेची मुदत मार्च महिन्यात संपणार आहे. या संस्थेकडून रोज 10 ते 15 श्‍वानांवर नसबंदीची शस्त्रक्रिया केली जात आहे, तर महापालिकेकडून 15 ते 20 शस्त्रक्रिया केल्या जात आहेत; मात्र निर्बीजीकरणाच्या तुलनेत श्‍वानांची संख्या दहा ते बारा पटींनी वाढत आहे. त्यामुळे निर्बीजीकरणासाठी आणखी एक संस्था नियुक्‍त करण्याचे नियोजन करून निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

हेही वाचा - मनोरुग्णांना इथे मिळणार पूर्ण उपचार  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation Streets Dog News