एकशे अठ्ठ्यांशी जणांचा मृत्यू!, 296 जखमी वाचा : काय झाले असेल? 

मनोज साखरे
Sunday, 5 January 2020

औरंगाबाद शहरात जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान एकूण 151 अपघात झाले त्यात 188 जणांचा मृत्यू झाला; तर 206 अपघातात 296 जण जखमी झाले. 

 

औरंगाबाद - तब्बल एकशे अठ्ठ्यांची जणांचा मृत्यू झाला ही बाब किती भयावह आहे. दोनशे सहा जणही अशा काही घटनांमध्ये गंभीर जखमी झालेयं. एवढी मोठी प्राणहानी एका वर्षात झाली ती केवळ आणि केवळ अपघाताने औरंगाबादेतील ही चिंताजनक स्थिती आहे. 

औरंगाबाद शहरात जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान एकूण 151 अपघात झाले त्यात 188 जणांचा मृत्यू झाला; तर 206 अपघातात 296 जण जखमी झाले. 

औरंगाबाद शहरातील वाहतूकीची स्थिती सहज घेण्यासारखी तर नक्कीच नाही. अत्यंत गंभीर परिस्थिती शहरातील वाहतूकीची बनली आहे. एकीकडे वाहनांची भरमसाठ संख्या, त्यात ऍपेरिक्षांची भाऊगर्दी, औद्योगिक वसाहतीमुळे मालवाहु वाहनांचीही वर्दळ मोठीच अशात छोट्या वाहनांचीही दिवसेंदिवस वाढती संख्या यामुळे निष्काळजी, हलगर्जीपणा यामुळे वाहनांचे अपघातात वाढ झाली आहे. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

बेफाम धावणारी वाहने, दुरवस्था झालेले रस्ते, चौकांची चुकीची रचना आणि वाहतुकीच्या बट्ट्याबोळामुळे शहरातील बहुतांश मार्ग मृत्युपथ झाले आहेत. वाहनचालकांचा हलगर्जीपणा व प्रशासनाची देखभाल-दुरुस्तीबाबतची उदासीनता यामुळे जनसामान्यांना पायी चालणेही कठीण झाले असून, जीव मुठीत धरून मार्गक्रमण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यात 188 अपघाताचे बळीही यंदाच्या वर्षात गेले आहेत. 

हेही वाचा - ...आणि त्याच्या डोक्यावरून गेले जेसीबीचे चाक

महावीर चौक ते चिकलठाणादरम्यान रस्त्यावर मोठी वर्दळ असते. ही वर्दळ सकाळी दहा ते बारा व सायंकाळी पाच ते सात या वेळात लक्षणीय वाढते. त्यामुळे जालना रस्ता ओलांडताना मोठी समस्या असते. पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडताना कसरत करावी लागते. चौकातून जाताना अपघात घडतात. 

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

बीड बायपास रस्त्यावर मार्गक्रमण करताना छोट्या वाहनांच्या चालकांच्याच नाकीनऊ येते. मग पादचाऱ्यांची स्थिती सांगणेही नको. शहरातील जळगाव रस्ता वगळता इतर बऱ्याच मुख्य रस्त्यांना फुटपाथही नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांचा जीव वाहनचालकांच्या हाती असल्याची स्थिती आहे. 

ड्रिंक ऍण्ड ड्राइव्हची 
पादचाऱ्यांना भीती 

दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. रात्रीच्यावेळी नशापान करून वाहने चालविल्याने रस्त्यावर अनेकांचा नाहक बळी गेला. अपघातातील एकूण बळीमध्ये 65 टक्के बळी दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे गेल्याची बाब काही आकडेवारीतून दिसून येते.

आकडे बोलतात..(नोव्हेंबर 2018 व 2019 वर्षातील अपघात व मृत, जखमी) 

 अपघाताचे प्रकार - 2018 - 2019 - वाढ/घट 

 प्राणांतिक अपघात - 142 - 172 - 30 ने वाढ. 
 मृत - 151 - 188 - 37 ने वाढ. 
 गंभीर दुखापतीचे अपघात - 203 - 206 - 03 ने वाढ. 
 गंभीर जखमी - 336 - 296 - 40 ने घट 
 किरकोळ अपघात - 78 - 79 - 01 ने वाढ. 
 किरकोळ जखमी - 101 - 109 - 08 ने वाढ. 
 दुखापत नसलेले - 80 - 59 - 21 ने घट 
नुकसानीचे अपघात 
 एकूण - 503 - 516 - 13 वाढ.  

यामुळे अपघाताला निमंत्रण

  1. अनेक मार्गावर दुभाजकांचा अभाव 
  2. बहुतांश सिग्नल सुरूच नाहीत 
  3. वाहतूक व महामार्ग पोलिसांची तोकडी संख्या 
  4. रस्त्यावर विद्युत दिव्यांचा अभाव 
  5. बेदरकार वाहनांच्या गतीवर चाप नाही 
  6. अरुंद रस्ते, ठोस कारवाईचा अभाव 
  •  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News 188 Killed in road accident