औरंगाबादेतही लवकरच प्लाझ्मा थेरपी, आयसीएमआरच्या मंजुरीची प्रतीक्षा

मनोज साखरे
Monday, 27 April 2020

कोवीड- १९ विषाणुचा संसर्ग झालेला रुग्ण व कोरोनामुक्त रक्तदाता (निकष पुर्ण करणारा) यांची तपासणी, सुरक्षितता आदीचे परिक्षण करुन डॉ. हेडगेवार रूग्णालयात प्लाझ्मा काढण्यात येईल व त्यांच्याकडूनच तो घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व आवश्‍यक तेथे पोचविले जाणार आहेत. जिथे मदत लागेल तेथे आम्ही मदतीस तयार असल्याचेहीडॉ. हेडगेवार रुग्णालयातील चेस्ट फिजिशियन व कोरोनाचे डॉ. व्यंकटेश देशपांडे यांनी सांगितले.

औरंगाबाद - चीन, दक्षीण कोरीया, अमेरिकेत प्लाझ्मा थेरेपीची मात्रा लागु पडल्यानंतर देशात प्लाझ्मा थेरपीचे क्लिनिकल ट्रायल सुरु झाले आहे. औरंगाबादेतील घाटी रुग्णालय आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयाने पाठविलेल्या संयुक्त प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे आहेत.

प्लाझ्मा थेरपीसाठी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडुन (आयसीएमआर) लवकरच मंजुरी मिळण्याचे सकारात्मक संकेत डॉक्टरांनी दिले आहेत. यानंतर रुग्णाचा विमा व अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) मान्यता या दोन तांत्रिकबाबींच्या पूर्ततेनंतर प्लाझ्मा थेरपी प्रत्यक्षात करण्यात येईल. 

कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला आहे. मात्र, त्यावर रामबाण औषध अद्यापही उपलब्ध नाही. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा पर्याय समोर आला आहे. शनीवारी (ता. २५) डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि घाटी रुग्णालयाने संयुक्त पातळीवर आयसीएमआरला याबाबत प्रस्ताव पाठविला.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

त्यावर लवरकच मंजुरी मिळेल असे घाटी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर तात्काळ सकारात्मक उत्तर येईल त्यानंतर क्लिनिकल ट्रायलसाठी रुग्णाची निवड व विमा उतरविण्याची तयारी सुरु करता येईल असे डॉ. हेडगेवार रुग्णालयातील चेस्ट फिजिशियन व कोरोनाचे डॉ. व्यंकटेश देशपांडे यांनी सांगितले. घाटी रुग्णालयासोबत आम्ही संयुक्त अभ्यास करीत असल्याचेही डॉ. देशपांडे म्हणाले. 

यासाठी क्लिनीकल ट्रायल... 

  • हा प्रायोगिक तत्वावरील कार्यक्रम आहे, सर्वच ठिकाणी ट्रायल झाल्यास त्याचे या थेरपीचे यश किती हे तपासता येईल. 
  • कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाची किती मदत होऊ शकेल का? हे तपासले जाईल. 
  • कोरोनामुक्त रुग्णाच्या अंटीबॉडीज कोरोनाबाधीतांच्या रुग्णाला तंदुरुस्त करण्यात किती मदत करु शकेल याचा अभ्यास केला जाईल. 
  • बऱ्याच मोठ्या शहरात प्लाझ्मा थेरपीची तयारी सुरु आहे. त्यांच्याशी संपर्क वाढवुन अजुन अचुकपणे या विषयात पुढे कसे जाता येईल हे पाहिले जाईल. 
  • क्लिनीकल ट्रायल व सर्व प्रक्रीयेतील बारकावे तपासले जाईल. 
  • प्लाझ्मा किती द्यावा. त्याच्या वेळा कोणत्या, कोणत्या स्टेजला काय लाभ होतो. कोणत्या स्टेजला लाभ होत नाही. याचाही अभ्यास होणार. 

असे होणार कार्य 
कोवीड- १९ विषाणुचा संसर्ग झालेला रुग्ण व कोरोनामुक्त रक्तदाता (निकष पुर्ण करणारा) यांची तपासणी, सुरक्षितता आदीचे परिक्षण करुन डॉ. हेडगेवार रूग्णालयात प्लाझ्मा काढण्यात येईल व त्यांच्याकडूनच तो घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व आवश्‍यक तेथे पोचविले जाणार आहेत. जिथे मदत लागेल तेथे आम्ही मदतीस तयार असल्याचेही डॉ. देशपांडे यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Awaiting ICMR Approval For Plasma Therapy