औरंगाबादेत घरोघरी साध्या पद्धतीने ईद उल अजहा साजरी 

शेखलाल शेख  
Saturday, 1 August 2020

० कोरोनामुळे घेता आली नाही आप्तस्वकियांची गळाभेट 
० स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ईदची नमाज घरातच अदा 
० शांती आणि कोरोनामुक्तीसाठी सर्वत्र दुआ 

औरंगाबाद : त्याग आणि बलिदानाची प्रतिक असलेली ईद उल अजहा (बकरी ईद) शनिवारी (ता. एक) रोजी घरोघरी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सर्वांनी आपल्या घरातच कुटुंबासोबत ईद-उल-अजहाची नमाज अदा केली. नमाजनंतर सर्वत्र शांती, कोरोनामुक्तीसाठी दुआ करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर कोरोनामुळे पहिल्यांदाच सर्वांना सर्वांनी ईद उल फित्र आणि ईद उल अजहा अशा दोन्ही ईदच्या नमाज ईदगाह मैदाने, मशिदी न जात घरातच नमाज अदा केल्या. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...  

कोरोनाचे संकट कायम असल्याने सरकार, स्थानिक प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहे. अंतराचे नियम पाळायचे असल्याने सर्वांना मित्र, परिवार, आप्तस्वकीयांची गळाभेट घेता आली नाही. सर्वांनी फोन आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या. इस्लाम धर्मात ईद उल फित्र आणि ईद उल अजहा यांना धार्मिक दृष्ट्या विशेष महत्व आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

त्यामुळे दरवर्षी शहरातील छावणी, रोजेबाग, उस्मापुरा, बीड बायपास, पडेगाव येथील ईदगाह मैदाने, शहरातील सर्वच मशिदीत ईदची नमाज अदा केली जाते. यंदा मात्र कोरोनामुळे धार्मिक कार्यक्रमांना नियम, अटी लागु करण्यात आल्या आहेत.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

सर्वांनी घरातच नमाज अदा करत शासनाच्या नियमांचे पालन करुन पालन केले. विशेष म्हणजे दरवर्षी ईद निमित्त बाजारपेठेत रौनक असते. यंदा बकरी ईद निमित्त बोकडांचा बाजार सुद्धा भरवता आलेला नाही.

Edited By Pratap Awachar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Celebrate Eid ul Azha Simple Way At Home