कोरोना लॉकडाऊनमुळे गुन्हेगारी थांबली, अपघातात लक्षणिय घट

corona
corona

औरंगाबाद - देशात लॉकडाऊन आहे. पोलिस रस्त्यावर पहारा देत आहेत. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी कमालीची घटली आहे. वाहनांची चाके थांबल्याने आठ दिवसांत एकही अपघाती मृत्यू झाला नाही, हे सुखद आहे. 

औरंगाबादेत २२ मार्च ते २९ मार्च या सात दिवसांच्या कालावधीमध्ये शहरात केवळ १९ गुन्हे दाखल झाले. अपघातात एकही मृत्यू झाला नाही. शहरात आठ दिवसांत केवळ आठ गुन्ह्यांची नोंद झाली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

याबाबत पोलिस आयुक्तांनी सांगितले की, आठवड्याला साधारणतः दोन ते तीन मृत्यू अपघाती होतात; मात्र लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर वर्दळ नाही. परिणामी, अपघाताची कोणतीही मोठी घटना समोर आलेली नाही. 

सरासरी २० वरून ०२ वर 
निव्वळ गुन्हेगारीच्या दृष्टीने विचार केल्यास शहरात सुमारे २० ते २५ गुन्हे सरासरी दाखल होतात. हे पोलिसांकडून प्राप्त सर्व पोलिस ठाण्यांमधील दैनंदिन दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते; मात्र आता हे प्रमाण दोनवर आले आहे. टक्केवारीचा विचार करता शंभरवरून गुन्हेगारी नऊ ते दहा टक्क्यांवर आली आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सर्वेक्षणात या गोष्टी वगळल्या 
दारू विक्रेत्यांवरील कारवाई, लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या व्यक्ती, वाहने, जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त उघडण्यात आलेल्या दुकानांबाबत गुन्हे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यासंबंधी गुन्हे या सर्वेक्षणात समाविष्ट केले नाहीत. 

२२ मार्च - (०१ गुन्हा) 
२३ मार्च - (०७ गुन्हे) 
२४ मार्च - (०२ गुन्हे ) 
२५ मार्च - (०२ गुन्हे ) 
२६ मार्च - (०२ गुन्हे ) 
२७ मार्च - (०१ गुन्हा ) 
२८ मार्च - (०२ गुन्हे ) 
२९ मार्च - (०१ गुन्हे )

आठ दिवसांत... 

  • शहरातील पोलिस ठाण्यात  गुन्हे दाखल 
  • एकही मोठा अपघात नाही 
  • एकाही अपघातात बळी नाही 
  • केवळ एकच छोटा अपघात 
  • आठ दिवसांत विनयभंगाचे चार गुन्हे 
  • घरगुती वादाचा एक गुन्हा 
  • लाच घेतल्याचे एक प्रकरण 
  • दोन दुचाकी चोरी 
  • चोरीची एक घटना 
  • अपहरणाची एक घटना 
  • गुटखा विक्री कारवाईची एक घटना 

शहरात चोख पोलिस बंदोबस्त आहे. गुन्हेगारीत पूर्णतः घट झाली. अपघातही थांबले. अपघातातील प्राणहानी टळली असली तरी कोरोनामुळे कुणाचा मृत्यू होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. 
- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com