esakal | मित्रांची कमालच! या वयातही केली गोवा टूर सायकलवरुन पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Cycle Tour

ठरल्याप्रमाणे या मित्रांनी ६ जानेवारीला शिवथरघळ येथून सायकल टुरला सुरवात केली.

मित्रांची कमालच! या वयातही केली गोवा टूर सायकलवरुन पूर्ण

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : कोरोना काळात लॉकडाउनमुळे जवळ आलेल्या ५० ते ६५ वर्षांच्या मित्रांनी कमालच केली आहे. सहज मनात आलेला गोवा टुरचा विषय मनाने तरुण मित्रांनी सायकलवरून पार करत हातावेगळा केला. नऊ दिवसांत त्यांनी तब्बल ५२० किलोमीटरचे अंतर कापले. पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन गेलेला चमूने निसर्गाच्या जवळ जाता आल्याची प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला.


कोरोना काळात राधामोहन कॉलनीतील संजीव गणोरकर (वय ६३), शेषराव माहोरकर (वय ६३), संजय पुजारी (वय ५५), अतुल डोळे (वय ५१) आणि प्रभाकर वाणी (वय ६४) यांनी मे २०२० पासून रोज सकाळी दहा ते बारा किलोमीटर सायकल चालवण्यास सुरवात केली. सायकलिंगसोबत रोज दहा ते १५ किलोमीटर पायी फिरणे, पळणे याचाही सराव सुरू केला होता. दरम्यान, सहज गप्पा मारताना ‘गोवा टूर’चा विषय समोर आला.


ठरल्याप्रमाणे या मित्रांनी ६ जानेवारीला शिवथरघळ येथून सायकल टुरला सुरवात केली. कोकण किनाऱ्यालगतच्या रस्त्याने शिवथरघळ, महाड, दापोली, पालगढ, गणपतीपुळे, रत्नागिरी, गुहागर, मालवण, वेंगुर्ला, म्हापसा ते पणजी असे अंतर पूर्ण केले. रोज ५०-६० किलोमीटरचे अंतर पार करत हा पल्ला गाठला. नऊ दिवसांत ५२० किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. कोकणातील कोस्टल भागातील डोंगर चढाई, उतराई करून पर्यावरण वाचवा चा संदेश देत पार केली.

वाचा औरंगाबादच्या ताज्या बातम्या

खूप शिकायला मिळाले
रस्त्याने निसर्ग बघत, समुद्र स्नानाचा लाभ घेत, सायकल सफर छान झाली, निसर्गाची जवळून ओळख झाली, पाण्याचं महत्त्व कळाले, या सायकल सफरीतून खूप शिकायला मिळाले, ऊर्जा बचतीचा संदेश देत आमची सायकल सफर यशस्वीपणे पूर्ण झाली. अशी प्रतिक्रिया सायकलपटूंनी पूर्ण केली. संपूर्ण सायकल प्रवासात श्री. वाणी यांनी कोकणातील डोंगर दरीत प्रथमच या वयात चारचाकी चालवून आपल्या सहकारी सायकलस्वारांना मार्गक्रमण करण्यासाठी सहकार्य केले.

संपादन - गणेश पिटेकर