जिद्द, मेहनतीच्या जोरावर तिने घेतली आकाशात झेप !

शेखलाल शेख
Saturday, 29 August 2020

औरंगाबादच्या गायत्री सरदेशपांडे यांचा अथक प्रवास. 
दीड वर्षांपासून नामांकित विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत. 

औरंगाबाद : जिद्द, मेहनत, चिकाटी करण्याची तयारी असेल तर आपले स्वप्न साकार करता येऊ शकते. असेच पायलट होण्याचे स्वप्न औरंगाबादच्या गायत्री अनिरुद्ध सरदेशपांडे यांनी बघितले होते. आपल्या जिद्दीच्या जोरावर त्या पायलट झाल्या. २०१० मध्ये त्यांनी कमर्शियल पायलटचे लायसन्स मिळविले. मागील दीड वर्षापासून त्या एका नामांकित विमान कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत आहेत.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
गायत्री सरदेशपांडे यांचे प्राथमिक शिक्षण औरंगाबादच्या होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूलमध्ये झाले. अंधेरी, मुंबई येथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शाळेपासूनच पायलट होण्याचे स्वप्न बघितलेल्या गायत्री यांनी २००७ मध्ये अहमदाबाद येथे एअरोनॉटिकल प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. येथे त्यांनी तीन वर्षे प्रशिक्षण पूर्ण केले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हाला प्रायव्हेटमध्ये दोनशे तासांचा फ्लाईटचा अनुभव असेल तर कमर्शियल लायसन्स मिळते. गायत्री यांना २०१० मध्ये कमर्शियल लायसन्स मिळाले आहे. मागील दीड वर्षापासून त्या बेंगलोर येथे एका नामांकित विमान कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल अशा दोन्हींचा अनुभव आहे. त्यांनी श्रीलंका, मालदीवमध्ये इंटरनॅशनल कार्गो फ्लाईटसुद्धा चालविली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
औरंगाबादच्या राजनगर येथे राहणाऱ्या गायत्री म्हणाल्या की, एअरोनॉटिकलमध्ये तरुणांना खूप स्कोप आहे. बारावीनंतर कोर्स असतो. यामध्ये तुमचे फिजिक्स आणि मॅथस् हे दोन विषय असणे गरजेचे असते. विमान उडविताना तुमच्यासाठी दररोज एक नवीन दिवस असतो. येथे खूप काही शिकण्यासारखे असते. आता स्ट्रगल प्रत्येक क्षेत्रात आहे. मात्र त्यावर मात करता येऊ शकते. तुम्ही मेहनत करण्याची तयारी ठेवायला हवी. तुम्हाला तुमचे स्वप्न नक्की साकार करता येऊ शकते. हे सर्व करीत असताना तुमच्या कुटुंबाची साथ खूप मोलाची असते. माझ्या आई-वडिलांची मला खूप साथ मिळाली. त्यांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे. माझ्या यशामध्ये आई-वडिलांचा वाटा सर्वात जास्त आहे. तसेच माझ्या शिक्षकांनीही मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. 

Edit- Pratap Awachar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad news Gayatri Sardeshpande became pilot