जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या गाद्या लोळू लागल्या जमिनीवर! 

बुधवार, 20 मे 2020

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी जिल्हा रुग्णालय आधीच भरले आहे. तिथे डॉक्टरांना थोडीही उसंत नाही तिथे अधिक ताण आहे; मात्र एवढ्या मोठ्या सुसज्ज रुग्णालयात अशी वेळ यावी ही धक्कादायक बाब आहे. 

औरंगाबाद ः महाराष्ट्रातील झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत औरंगाबाद आता चौथ्या स्थानी आले असून, शहरातील आरोग्य सुविधांतही बऱ्याच उणिवा आढळत आहेत. महापालिकेला शववाहिनी, रुग्णवाहिका भाड्याने घ्यायची वेळ आल्यानंतर आता जिल्हा रुग्णालयात रुग्ण, लहान मुलांच्या नातेवाइकांना खाटांअभावी अक्षरश: जमिनीवर गादी टाकून आराम करावा लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी जिल्हा रुग्णालय आधीच भरले आहे. तिथे डॉक्टरांना थोडीही उसंत नाही तिथे अधिक ताण आहे; मात्र एवढ्या मोठ्या सुसज्ज रुग्णालयात अशी वेळ यावी ही धक्कादायक बाब आहे. 

दुसरी बाब म्हणजे रुग्ण अधिक वाढल्यास पाच खासगी रुग्णालयात खाटा ताब्यात घेण्याचे प्रशासनाने ठरवले होते. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असताना एक रुग्णालय वगळता चारही रुग्णालयात अद्यापपर्यंत खाटा ताब्यात घेतल्या गेल्या नाही हे विशेष. 

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   

शहरात कोरोनासुराचा कहर होत असून, आतापर्यंत तब्बल एक हजार ७५ पेक्षा अधिक रुग्ण बाधित आढळले आहेत. सुमारे सातशेच्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालय रुग्णांनी पूर्णपणे खचाखच भरले आहे. २०० खाटा या रुग्णालयात आहेत.

हेही वाचा - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली  

मुळात १४० रुग्णांची क्षमता असतानाही उर्वरित खाटा आहेत तरी कुठे हाही प्रश्न आहेच. प्रौढ रुग्ण असो की अल्पवयीन रुग्णांचे पालक त्यांना अक्षरशः जमिनीवर गादी टाकून आराम करावा लागणे हेही आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. 

विशेष म्हणजे या रुग्णालयातील स्वछतागृह आणि बेसिनसह इतरत्र घाण पसरली आहे. तिथे वेळीच स्वछता केल्यास डॉक्टरांच्याही आरोग्याला बाधा पोचणार नाही. 

कोविडबाधित लहान रुग्णांचे पालक निगेटिव्ह आहेत. तरीही त्यांनी विनंती केली होती, की आम्हाला येथे राहू द्या. त्यांची विनंती मान्य केली. आज त्यांनी गाद्या घेतल्या, ऑपरेशन थिएटरमध्ये टाकल्या व ते झोपी गेले. त्यांना समजावून सांगितले आहे. 
-डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक 

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..  

 ब्लॉग - अस्वस्थ वर्तमान 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Hygiene And Health In The District Hospital Is In Danger