esakal | यंदाच्या शिवजयंतीची मानाची मिरवणूक रद्द, महोत्सव समितीचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Latest News

नवीन औरंगाबाद शहर शिवजयंती महोत्सव शुक्रवारी साध्या पद्धतीने साजरी होणारा आहे, अशी माहिती पंजाबराव वडजे, सचिव योगेश मसलगे यांनी दिली.

यंदाच्या शिवजयंतीची मानाची मिरवणूक रद्द, महोत्सव समितीचा निर्णय

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून १९७० पासून शहरात संस्थान गणपती राजा बाजार येथून मानाची मिरवणूक काढण्यात येते. यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शुक्रवारी (ता.१९) निघणारी शिवजयंती मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी (ता.१८) पोलिस आयुक्त आणि जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे यंदा मिरवणुकीसह कुठलाही कार्यक्रम न घेता साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, कार्याध्यक्ष प्रा. मनोज पाटील, संतोष कावले, आनंद वाघ यांच्यात बैठक घेण्यात आली. यात संस्थान गणपती येथून निघणारी मिरवणूक रद्द करण्यात आली. यात सर्व पद्धतीचे कार्यक्रम रद्द करीत शिवजयंतीच्या दिवशी सकाळी नऊ वाजता क्रांती चौकात अभिवादन करण्यात येणार आहे.

वाचा - कोरोना लस घेतलेले दोन डॉक्टर पॉझिटिव्ह, पहिल्या डोसनंतरही धोका कायम


दरम्यान, नवीन औरंगाबाद शहर शिवजयंती महोत्सव शुक्रवारी साध्या पद्धतीने साजरी होणारा आहे, अशी माहिती पंजाबराव वडजे, सचिव योगेश मसलगे यांनी दिली. तसेच नवीन औरंगाबाद गणेश महासंघातर्फे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता गजानन महाराज मंदिर चौकात अभिवादन कार्यक्रम घेण्यात येत आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे पाटील, अध्यक्ष विलास शेळके, शेख रईस, हरचरणसिंग गुलाटी, बाळासाहेब साळुंके, तेजस खरात, बाळासाहेब हरबक यांनी दिली.

संपादन - गणेश पिटेकर