
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे.
औरंगाबाद : शासन निर्देशानुसार जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरु झाले. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यानंतरही दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ होत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली. जिल्ह्यात २०१० शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या. त्यावेळी ५५ हजार ९३९ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता शाळांकडून घेतली जात असल्याने पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास संमतिपत्र दिले आहे.
औरंगाबाद- नगर रस्त्यावर नातेवाईकाकडे निघालेल्या दुचाकीस जोरदार धडक; महिला ठार, एक गंभीर जखमी
त्यामुळे शाळा सुरू होण्यासह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी २५.३४, दुसऱ्या दिवशी ३३.९० तर तिसऱ्या दिवशी ३८.२० टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. जिल्ह्यातील २ हजार १६८ शाळा आहेत. त्यापैकी २ हजार १५७ शाळा सुरु झाल्या आहेत. ११ शाळा अद्याप बंद आहेत.
औरंगाबादेत बॅंकेला २६ लाखांचा गंडा, बनावट सोने तारण ठेवून फसवणूक
शाळांकडून दैनंदिन अहवाल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. शिक्षक, पालकांत सकारात्मकता दिसून येत आहे. कोरोना नियमांचे नियमित पालन करावे, स्वच्छतेवर भर द्यावा, शाळा सॅनिटायझेशनमध्ये खंड पडू देऊ नये आदी सूचना देण्यात येत असून याबाबत दैनंदिन अहवाल मागवला जात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा
शहरात पाचवीचे वर्ग कधी?
राज्यात सर्वच ठिकाणी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. मात्र, औरंगाबाद महापालिका हद्दीतील पाचवीचे वर्ग अद्याप बंद आहेत. ते कधी सुरु होणार याबाबत पालकांकडून शाळांना विचारणा केली जात आहे.
Edited - Ganesh Pitekar