esakal | औरंगाबादेत नऊ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह!
sakal

बोलून बातमी शोधा

corona photo.jpg

येत्या २३ तारखेपासून शाळा सुरु करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातही कोरोना चाचणी सुरु आहे. कालपासून सुरु असलेल्या या टेस्टमध्ये नऊ शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शिक्षकवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

औरंगाबादेत नऊ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह!

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : येत्या २३ तारखेपासून शाळा सुरु करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातही कोरोना चाचणी सुरु आहे. कालपासून सुरु असलेल्या या टेस्टमध्ये नऊ शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शिक्षकवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावी अनुदानित व विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी केल्या शिवाय शाळेत नो एन्ट्री असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयाकडे चाचणी करून घेण्यासाठी धाव घेत आहेत. कोरोना चाचणीचा अहवाल शिक्षकांनी नंतर शाळेत सादर करावा लागणार आहे. शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने ११ हजार ४८३ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करायची आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आत्तापर्यंत एक हजार ६४६ शिक्षक कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये एकूण नऊ शिक्षक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली. अजून सुमारे दहा हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करायची आहे. त्यामध्ये किती शिक्षक कोरोना बाधीत आढळतील असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कार्यमुक्तीचे काय? 
शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि शाळा बंद असल्याने अनेक शिक्षकांना कोविड आणि निवडणूकीच्या इतर कामांसाठी घेतले होते. त्या शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त केलेले नाही. आता आरटीपीसीआर चाचणीत देखील शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे शाळेत शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती कशी राहाणार? असा प्रश्न मुख्याध्यापकांनी पडला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)