Atul Save News
Atul Save News

पाणीपुरवठा योजनेसाठी तीस लाखांची जाहिरात करणाऱ्यांनी लसीकरणाविषयी बॅनर ही लावलं नाही, अतुल सावे यांची टीका

औरंगाबाद : शहरातील सोळाशे ८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरात आले होते. त्यावेळी स्मार्ट सिटीच्या पैशातून पंधरा लाखांच्या जाहिराती आणि पंधरा लाखांचे बॅनर लावले होते. लसीकरण सुरू झाले आहे. मात्र याविषयी साधे बॅनर लावण्याची तसदीही प्रशासनाने घेतली नाही. एकीकडे पैसा उधळायचा आणि दुसरीकडे लसीकरणाविषयी उदासीनता दाखवायची हा कुठला प्रकार अशी तिखट प्रतिक्रिया आमदार अतुल सावे यांनी शनिवारी (ता.दहा) दिली. 

शहर व जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले आहे. केंद्रातर्फे लसीकरणाचा पुरवठा केला जातो. राज्याला मुबलक प्रमाणात लशींचा साठा देण्यात आला आहे आणि हा साठा टप्प्याटप्प्याने देण्यात येत आहेत असे असले तरी आरोग्यमंत्री व सरकारमधील लोक लस नसल्याच्या नावाने ओरडत आहेत.  लसीकरण आणि कोरोनाबाबत प्रशासनाला गांभीर्य नाही. म्हणूनच ज्या वेळी कोणाची रुग्ण संख्या वाढली. त्याच वेळी शहरातील ११५ वार्डात लसीकरण केंद्र सुरू करायला पाहिजे होते. असा टोलाही आमदार अतुल सावे यांनी लगावला.


गेल्या वर्षी ऑक्सिजनचा तुटवडा होता. आम्ही पालकमंत्र्यांच्या मागे लागून ऑक्सिजनसाठी पाठपुरावा केला व मेल्ट्रोन आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी केली होती. यातील मेल्ट्रोनमध्ये ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रकल्प मात्र अजूनही अपूर्णच आहे.माझे कुटुंब माझे जबाबदारीचे गावागावात होर्डिंग लागले आहेत. मात्र लसीकरणाविषयी एकही बॅनर नाही. होल्डिंग नाही अथवा जाहिराती केलेली नाही. एकीकडे पाणीपुरवठा योजनेच्या नावावर केंद्राच्या स्मार्टसिटीचा पैसा उडवायचा आणि दुसरीकडे लसीकरणाविषयी साधी जाहिरातीने द्यायची हा तर राज्य सरकारचा दुटप्पीपणाचा म्हणावा लागेल. स्मार्ट सिटीतील पंधरा लाखाची जाहिरात आणि पंधरा लाखाचे बॅनरचा हिशोब याविषयी खासदारांनी स्मार्ट सिटीला पत्र लिहावे असेही हम आमदार अतुल सावे म्हणाले.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com