नवीन वैशिष्ट्यांसह धावणार आता औरंगाबादेतील 'स्मार्ट सिटी बस' 

मधुकर कांबळे
Sunday, 18 October 2020

  • साठ रुपयात दिवसभर शहरात कुठेही करता येईल प्रवास.
  • सवलती मिळवण्यासाठी स्मार्ट कार्ड. 
  • प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण . 

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे पडलेल्या ब्रेकनंतर पहिल्यांदा स्मार्ट सिटी शहर बस सेवा नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणि वैशिष्ट्यासोबत सुरू करण्यात येणार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शहरवासीयांच्या मिळालेल्या भरभरून प्रतिसादासह जानेवारी २०१९ मध्ये स्मार्ट बस सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर कोविड १९ च्या महामारीमुळे ही सेवा थांबवण्यात आली होती. मात्र आता औरंगाबाद स्मार्ट सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे ही बस सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

स्मार्ट सिटी बस विभागाचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत भुसारी म्हणाले की, शहर बससेवा अँड्रॉइडद्वारे संचालित ई- तिकीट सिस्टीम सोबत येत आहे. ह्या सिस्टीमद्वारे प्रवासी बस भाडे रोख रक्कमेच्या व्यतिरिक्त स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड आणि मोबाईल वॉलेट द्वारे ही देऊ शकतात. ते म्हणाले. या स्मार्ट कार्डाचा वापर करून प्रवासी वेगवेगळ्या सवलतीचा लाभ घेऊ शकतात. दिवसाला फक्त साठ रुपये देऊन शहरात कोठेही प्रवास करता येईल. साप्ताहिक रिचार्ज अंतर्गत केवळ पाच दिवसाचे पैसे देऊन नागरिक सात दिवस प्रवास करू शकतील. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मासिक योजनेअंतर्गत नागरिक केवळ २० दिवसाचे पैसे देऊन ३० दिवस प्रवास करू शकतील आणि त्रैमासिक योजनेअंतर्गत साठ दिवसाचे भाड्यात ३० दिवस मोफत प्रवास करता येणार. आता स्मार्ट सिटी शहर बस नैमित्तिक करारांतर्गत सामाजिक सांस्कृतिक, खाजगी कार्यक्रमासाठी आणि शाळेत सहली साठी बुक करता येणार. बस सेवेसाठी कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना ही करण्यात येणार आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
प्रत्येक फेरीनंतर सिडको बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि औरंगपुरा येथे बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. बसमधील डिजिटल डिस्प्ले आणि ऑडिओ सिस्टीमचा उपयोग प्रवाशांना कोविड -१९ प्रतिबंधात्मक सूचना देण्यासाठी केला जाईल. या सुविधा नंतर ही औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवा ही सर्वात परवडणारी सार्वजनिक बस सेवा आहे. "बस भाडे प्रति किलोमीटर दोन रुपये पासून सुरू होणार असून हे सर्वात स्वस्त दर राहतील असा विश्‍वास श्री. भुसारी यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Smart City Bus run with new features