राज्यभरात नामुष्की झाली, अन् औरंगाबाद महापालिकेला जाग आली !
औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे स्मार्ट सिटी अभियानातील सुमारे ३९० कोटींची कामे रखडली असून, त्याचा फटका शहराच्या रँकिंगला बसला आहे. त्यामुळे विविध कामांच्या निविदा पुढील आठवड्यात काढण्यात येतील, असे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्याधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (ता. २८) सांगितले.
स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत महापालिकेत शहर बस, एमएसआय, शहरातील ऐतिहासिक गेटची डागडुजी यासह काही महत्त्वाची कामे हाती घेतली होती; मात्र शहर बस वगळता इतर कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. यासंदर्भात श्री. पांडेय म्हणाले, की कोरोनामुळे स्मार्ट सिटीच्या कामांना फटका बसला. लॉकडाउनच्या काळात कामे बंद होती. त्यामुळे स्मार्ट सिटी अभियानातील सर्वच शहरांचे रँकिंग कमी-अधिक झाले आहे. औरंगाबाद लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे येत्या काही दिवसांत कामांना गती दिली जाईल. काही कामांच्या निविदा पुढील आठवड्यात काढल्या जातील, त्यापुढील प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू केली जातील असे पांडेय म्हणाले. सफारी पार्क, ई-शासन प्रणाली यासह इतर निविदांचा यात समावेश आहे.
दोनशे कोटींचा निधी मिळाला
केंद्र व राज्य शासनाने यापूर्वी दिलेला निधी संपत आला आहे. त्यामुळे निधीसाठी पाठपुरावा सुरू होता. लॉकडाउनच्या काळात प्रयत्न करून सुमारे दोनशे कोटींचा निधी मिळवला, असे श्री. पांडेय यांनी सांगितले.
अशी आहेत रखडलेली कामे
एमएसआय प्रकल्प - १७८.७३ कोटी
स्मार्ट बस निवारे - ५ कोटी
सफारी पार्क - १६० कोटी
ऐतिहासिक दरवाजांचे जतन आणि संवर्धन - ०४ कोटी
ई-शासन प्रणाली - ४० कोटी
ई-तिकीट व अन्य बससेवा - ३ कोटी
Edit By Pratap Awachar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.