एसटी बॅंक कर्मचाऱ्यांचे काय आहे आंदोलन 

photo
photo

औरंगाबाद : तब्बल चौदाशे कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि हजार एसटी कर्मचारी सभासद असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑप बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या वयोमर्यादा वाढवण्याच्या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मंगळवार (ता. 21) पासून लेखणी बंद आंदोलनाला प्रारंभ केला आहे. 

पेन डाऊन सुरु 

एसटी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वरुन 60 करावे, वेतन कराराची कोंडी दुर करावी, खातेनिहाय बढती, परिक्षेतील उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना तात्काळ नियुक्तीपत्र द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पेन डाऊन केल्यामुळे बॅंकेचे कामकाज होऊ शकलेले नाही. दोन दिवसांपासून बॅंक कर्मचारी संपावर असताना, अद्याप प्रशासनाने काहीही निर्णय घेतला नाही. एसटीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांची दोनच दिवसापुर्वी बदली झाल्याने यावर काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. 

राज्यभर व्यवहार ठप्प 

बॅंक कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे राज्यातील 51 शाखा आणि 11 विस्तारीत कक्षांमधील 436 कर्मचारी अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलनात भाग घेतला आहे. एप्रिल 2017-19 पर्यंतचा वेतन करार मार्च 2020 मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे वेतन करार आणि वयोमर्यादा वाढवण्याच्या अनुशंगाने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. 

आजपासून शटर बंद 

एसटी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांडे दोन दिसवांपासून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बॅंक कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. गुरुवारपासून (ता. 23) बॅंकेचे शटर बंद ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

कर्मचाऱ्यांचा मात्र विरोध 

एसटीच्या बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या वयोमर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव एसटी बॅंकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देवोल यांनी पुर्वीच फेटाळून लावलेला आहे. तरीही सदर मागणी पुन्हा एकदा पुढे करत एसटी बॅंकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले. एसटी बॅंकेत नेमलेले सर्व कर्मचारी हे बॅंकेच्या संचालक मंडळाशी संबधित असल्याने बॅंकेच्या संचालकांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला आहे. दुर्दैवाने ही मागणी मान्य झाल्यास बॅंकेवर वाढत्या पगारा पोटी किमान दोन कोटीचा बोजा पडणार आहे. एसटी च्या चालक वाहकांच्या श्रमातून व घामाच्या पैशातून उभारलेली ही बॅंक अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या अवाजवी मागण्याना बळी पडल्यास भविष्यात बॅंक आर्थिक संकटात सापडेल अशी शंका व्यक्त करुन एसटी कर्मचाऱ्यांनी मात्र याला विरोध केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com