औरंगाबादच्या शिक्षकाचा आमदार निवासावर चढून आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

वेतन अनुदानाबाबत सरकार निर्णय घेत नसल्याने शिक्षकाने उचलले टोकाचे पाऊल. 

औरंगाबाद : वेतन अनुदान वितरित करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जात नाही. त्यामुळे औरंगाबाद येथील शिक्षक गजानन खैरे यांनी मंत्रालयाजवळील आमदार निवासावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अखेर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करून शिक्षकाला इमारतीवरून खाली उतरवले. तसेच वेतन अनुदान देण्याबाबत उपसमिती स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वीस वर्षांपासून शिक्षकांना अनुदान नसल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत खैरे यांनी नुकतेच औरंगाबाद ते मुंबई पायी दिंडी काढली. यावेळी शिक्षण मंत्र्यांनी अनुदान देण्याचे आश्वासन दिले. पण त्यावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने खैरे यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्र्यांच्या निवासस्थाना बाहेर पायी दिंडी काढण्याचा निर्णय घेतला. यावेळी पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल केले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अखेर या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खैरे यांनी आमदार निवासाच्या इमारतीवरून आत्महत्येचा निर्णय घेतला. बुधवारी  सायंकाळी सहा वाजता खैरे इमारतीवर चढले. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. त्यांना खाली उतरविण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि नेत्यांनी प्रयत्न केले. अखेर वेतन अनुदान वितरित करण्यासाठी समिती गठित करण्याचे लेखी आश्वासन खैरे यांना देण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad teacher attempts suicide on MLA residence