औरंगाबाद : वंचितचे डफली बजाओ आंदोलन; पदाधिकाऱ्यांना अटक पहा (VIDEO) 

शेखलाल शेख
Wednesday, 12 August 2020


आंदोलन करणाऱ्यांना क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले 
मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक येथे आंदोलन 

औरंगाबाद : राज्यातील परिवहन सेवा सुरु करावी, औरंगाबाद शहरातील शहर बस सेवा सुरु करावी. गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्यांना काम करु द्यावे, त्यांना रोजगार द्यावा यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे बुधवार (ता.१२) सिडको बसस्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानक येथे आंदोलन करण्यात आले. मध्यवर्ती बसस्थानक येथे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

मध्यवर्ती बसस्थानक येथे वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्‍चिम व महिला आघाडी यांच्यातर्फे डफली बजाव आंदोलन झाले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा ॲड. लताताई बामने, जिल्हाध्यक्ष योगेश बन तसेच महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाठ, प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, कृष्णा बनकर तानाजी भोजने, ॲड. रामेश्वर तायडे, प्रा. अब्दुल समद, मिलिंद बोर्डे, शैलेंद्र मिसाळ, सदस्य श्रीरंग ससाणे, एस. पी. मगरे, ऍड. पी के दाभाडे, भगवान खिल्लारे, वंदना नरवडे, नंदा गायकवाड यांची उपस्थिती होती. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

सिडको बसस्थानकात राज्याते प्रवक्ते अमित भुईगळ यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. मागणीचे निवेदन एसटी महामंडळाच्या अधिका-यांना देण्यात आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एसटी बस सेवा सुरु केली तर नागरीकांना दिलासा मिळेल. हातावर पोट भरणाऱ्यांचा रोजगार बंद झाल्याने त्यांचे उर्दनिर्वाहचे साधन बंद असल्याने लोक त्रस्त झाले आहे.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

एसटी सुरु झाली तर त्यावर अवलंबुन असलेल्यांना हातभार मिळेल. मागील चार महिन्यांच्या अभ्यास केल्यानंतर कोरोनाच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षा घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सुधारण करण्याची गरज आहे. लोकांचा रोजगार व एकूणच उद्योग व्यवसाय व अर्थ व्यवहार तातडीने सुरु करण्याची आवश्यकता आहे. ८० टक्के लोकांची कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती दाखविली आहे. १५ टक्के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देवुन कोरोनाशी मुकाबला करण्यात यशस्वी झाले.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

५ टक्के लोकांचा प्रश्‍न आहे. अर्थव्यवस्था संकटात आहे. गेल्या चार महीन्याचा आढावा घेवून सरकारने काही तातडीने निर्णय घ्यावा. ८० टक्के पेक्षा अधिक लोकसंख्येला बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागत आहे. आरोग्य विषयक सुरक्षिततेचे नियमाचे पालन करत सर्व व्यवहार सुरु करावे. एसटी, बेस्ट व सर्व शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारने त्वरित सुरु करावी. यावेळी अमित भुईगळ, संदीप सिरसाठ, प्रभाकर बकले, जमील देशमुख, वंदना नवरडे यांची उपस्थिती होती. 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad vanchit Bahujan aaghadi Duffy Bajao Andolan