जि.प. स्थायी समितीच्या सभेत मराठा आरक्षणासाठी प्रस्ताव

दुर्गादास रणनवरे
Friday, 18 September 2020

  • मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अध्यादेश काढावा.
  • जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांचा स्थायी समितीच्या सभेत प्रस्ताव. 

औरंगाबाद : ओ. बी. सी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता अनुसूची-९ मध्ये समाविष्ट करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अध्यादेश काढावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी शुक्रवारी (ता.१८) स्थायी समितीच्या बैठकीत ऐन वेळेचा प्रस्ताव मांडला. कुठल्याही व्यक्तीचा अथवा समाजाचा आर्थिक, सामाजीक व राजकीय ऊन्नतीसाठी समान संधी मिळणे हा मुलभूत अधिकार आहे. समान संधी मिळाली नाही किंवा दिली नाही तर आरक्षणाने सामाजीक, आर्थिक व राजकीय उन्नती शक्य होते. हाच महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षणाचा हेतू आहे असेही ते म्हणाले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मराठा आरक्षणाचा सध्या प्रश्न हा ज्वलंत प्रश्न आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी इच्छा व्यक्त केली होती. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदर्भातील मराठा समाजाला अनुसूचीत यादीमध्ये टाकून त्यांना ओ.बी.सी प्रवर्गात कुणबी असे संबोधले. आज एकत्र कुटुंबाचे विभक्त कुटुंब झाले. त्यामुळे ५० वर्षांपूर्वी ५० एकरचा मालक आज ५ एकरावर आला आहे. परणामी हा समाज आता वंचित समाज म्हणून मागे पडला आहे. यासाठी आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अनुसूची ९ मधे संशोधन करून दुरुस्ती करावी 
आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथील बहुसंख्य असलेल्या समाजाला २३% स्वतंत्र तरतूद केली आहे. यासाठी अनुसूची ९ मधे संशोधन करून दुरुस्ती करावी लागेल. व मराठा समाजाला यात समाविष्ट करावे लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. अनुसूची ९ मधे दुरुस्ती करण्याकरिता अधिकार राज्य विधीमंडळाला नाही तर संसदेला आहे. राज्य सरकारने अनुसूची ९ मध्ये या समाजाच्या आर्थिक आणि वंचित मागासलेपनाचा दुरुस्ती विधेयक मंजूर करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव त्यांनी सभागृहात मांडला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Zilla Parishad standing committee meeting