सदस्यांच्या तक्रारींचे निवारण करा, डॉ. गोंदावलें यांचे खातेप्रमुखांना आदेश

दुर्गादास रणनवरे
Tuesday, 8 September 2020

जिल्हा परिषद सदस्यांनी विविध विकास कामांच्या संचिका खोळंबल्या बद्दल डॉक्टर गोंदावले यांचे लक्ष वेधले व नाराजी व्यक्त केली. यावर खुलासा करतांना डॉ. गोंदावले यांनी सर्व तक्रारींचे तात्काळ निवारण केले जाईल असे आश्वासन दिले व सर्व खातेप्रमुखांना कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही केल्या. 

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या विविध अडीअडचणी, खोळंबलेल्या विविध विकास कामाच्या संचिका तसेच तक्रारींचे सर्व खाते प्रमुख यांनी तात्काळ निवारण करावे अशा सूचना सोमवारी (ता. ०७) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी सर्व खातेप्रमुखांना दिल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना रामराव शेळके यांच्या दालनामध्ये अधिकारी व पदाधिकारी तसेच काही जिल्हा परिषद सदस्य यांची समन्वय बैठक घेण्यात आली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

या बैठकीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांनी विविध विकास कामांच्या संचिका खोळंबल्या बद्दल डॉक्टर गोंदावले यांचे लक्ष वेधले व नाराजी व्यक्त केली. यावर खुलासा करतांना डॉ. गोंदावले यांनी सर्व तक्रारींचे तात्काळ निवारण केले जाईल असे आश्वासन दिले व सर्व खातेप्रमुखांना कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही केल्याचे या सूत्रांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी यांचे कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी व त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी लक्ष घालावे अशा सूचनाही यावेळी केल्या.  बैठकीला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड शिक्षण व आरोग्य समिती सभापती अविनाश गलांडे पाटिल महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा अतुल चव्हाण तसेच जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड संतोष शेजुळ किशोर पवार आदींसह जिल्हापरिषदेच्या सर्व खातेप्रमुख अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अनुराधा चव्हाण यांचा सत्कार 
जिल्हा परिषदेच्या महिला व समाज कल्याण समितीच्या सभापती अनुराधा अतुल चव्हाण यांची पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त सदस्यपदी निवड झाल्याबद्दल यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अनुराधा चव्हाण यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्यपालांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कायदा १९८ अंतर्गत महिला सामाजिक कार्यकर्ता या वर्गातून पाच वर्षाच्या कालावधी करता अनुराधा चव्हाण यांची ही नियुक्ती केली आहे पशु दुग्धउत्पादन व मत्स्य शिक्षण व संशोधन या विषयात महाराष्ट्र राज्यात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल अनुराधा चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. या पदाच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील असे सत्काराला उत्तर देताना अनुराधा चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Edit- Pratap Awachar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad ZP CEO Dr. Gondavale order to the department head