कोणी घेतला काळ्या फिती लावून काम करण्याचा पवित्रा, वाचा सविस्तर. 

दुर्गादास रणनवरे
Sunday, 6 September 2020

जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटतर्फे सोमवारी काळ्या फिती लावून निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद :  महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना ही वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची राज्यस्तरीय संघटना असून मागील बऱ्याच कालावधीपासून कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे. परंतु संघटनेच्या मागण्यांकडे ग्रामविकास विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता.०७) काळ्या फिती लावून आपापले नियमित कर्तव्य बजावणार असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष अतुल मुळे, कार्याध्यक्ष विष्णू घुगे, राज्य सरचिटणीस पंकज गोरले यांनी कळविले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..
संघटनेतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, जिल्हास्तरावर सोमवारी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपापले नियत असलेले कर्तव्य बजावून दुपारच्या जेवणाच्या वेळेमध्ये जिल्ह्यातील संघटनेच्या प्रतिनिधींनी आपापल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करावे व  सदर निवेदन शासनास पाठविण्याबाबत विनंती करावी असे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कनिष्ठ सहाय्यक या पदाची सेवाप्रवेश नियम तात्काळ प्रसिद्ध  करण्यात यावे, परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां प्रमाणे पदोन्नतीने समायोजन करावे, जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर कराव्यात, तीन लाभांची  आश्वासित प्रगती योजना नियमीत दहा वर्ष, बारा वर्षे कालावधीत २० सेवेनंतर दुसरा लाभ मंजूर करण्यात यावा तसेच लाभांची थकबाकी तत्काळ प्रदान करण्यात यावी आदी मागण्यांसाठी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला जाणार आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(संपादन - प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad ZP news Worker agitation with black ribbons