बालाजी सुतार यांना 'बी. रघुनाथ स्मृती पुरस्कार'

बालाजी सूतार.jpg
बालाजी सूतार.jpg

औरंगाबाद : मराठवाड्याचे भुषण असलेले ज्येष्ठ मराठी लेखक बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिनी ‘बी. रघुनाथ स्मृती पुरस्कार’ दरवर्षी ७ सप्टेंबरला 
एका मराठी लेखकाला देण्यात येतो. नाथ समुह व परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने गेली ३१ वर्षे हा उपक्रम चालू आहे. या वर्षी हा पुरस्कार बालाजी सुतार यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहाला जाहिर झाला आहे.

आत्तापर्यंत भास्कर चंदनशीव, रंगनाथ पठारे, नागनाथ कोत्तापल्ले, फ.मुं.शिंदे, बाबु बिरादार, निरंजन उजगरे, ललिता गादगे, श्रीकांत देशमुख, भारत सासणे, नारायण कुलकर्णी कवठेकर, प्रकाश देशपांडे केजकर, बब्रुवार रूद्रकंठावार, राजकुमार तांगडे, रमेश इंगळे उत्रादकर, ल.म.कडु, सुहास बहुळकर, नितीन रिंढे, रेखा बैजल यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार साधेपणाने बालाजी सुतार यांना नाथ समुहाच्या कार्यालयात प्रदान करण्यात येईल. हा कार्यक्रम बी. रघुनाथ यांच्या स्मृती दिनी म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे. पुरस्कार निवड समितीवर प्रा. अजीत दळवी, प्रा. दासू वैद्य व श्रीकांत उमरीकर यांनी काम पाहिले.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन     
नाथ समुह व परिवर्तन यांनी संयुक्त विद्यमाने दरवर्षी या निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येते. पण यावेळी कोरोना आपत्तीमुळे सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही. पुढील वर्षी पुरस्कारासोबतच कार्यक्रमांचे आयोजन पूर्वीसारखेच केले जाणार आहे. नाथ समुहाचे नंदकिशोर कागलीवाल, सतिश कागलीवाल तसेच परविर्तनचे प्रा. मोहन फुले, डॉ. सुनील देशपांडे, लक्ष्मीकांत धोंड,  डॉ. आनंद निकाळजे, राजेंद्र जोशी, नीना निकाळजे यांनी रसिकांचे आत्तापर्यंतच्या सहकार्यासाठी आभार मानले असून पुढच्या वर्षीच्या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.

बालाजी सुतार यांचा परिचय  
बालाजी सुतार मुळचे अंबेजोगाईचे आहेत. सध्या औरंगाबादला स्थायिक आहेत. त्यांच्या  ‘गावकथा’ नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात सर्वत्र झाले आहेत. विविध वाङ्मयीन नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘रिस्पेक्ट’ आणि ‘हाजरी’ या दोन चित्रपटांचे संवादलेखन त्यांनी केले. ‘दोन जगातला कवी’ या त्यांच्या कथेवर लघुचित्रपट निघाला आहे. यापूर्वी त्यांना कणकवली येथील ‘आवानओल’ पुरस्कार व मुंबई साहित्य संघाच्या ‘कथाकार शांताराम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com