‘बामु’ने बनविले हॅण्ड फ्री सॅनिटायझर डिस्पेंसर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

दिनदयाळ उपाध्याय कौशल केंद्राचे संचालक डॉ. महेंद्र सिरसाठ यांनी चार प्रकल्प सादर केले. यामध्ये ऑटोमेटेड सॅनिटायजर डिस्पेंसर (टच फ्री) व ऑटोमेटेज सॅनिटायजर बूथ ही दोन उपकरणे साकारण्यात आली आहेत. एक डिस्पेंसर निर्मितीचा खर्च चारशे रुपयांच्या आसपास आहे. मोठ्या प्रमाणात निर्मिती केल्यास हाच खर्च निम्म्यात येईल.

औरंगाबाद : दिनदयाळ उपाध्याय कौशल केंद्रातर्फे ‘ऑटोमेटेड सॅनिटायजर डिस्पेसर’ निर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. ‘कोविड १९’ नंतरच्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सीएसआरअंतर्गत याचे वितरण करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मास्क निर्मितीचा प्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यापुर्वीच हाती घेतला आहे. या अंतर्गत तीन हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत. या संदर्भात प्राध्यापकांनी पुढाकार घेऊन आपत्तीजन्य परिस्थितीत विविध प्रकल्प हाती घ्यावेत, अशी सूचना कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत केली होती. या काळात विद्यार्थ्यांना नैतिक पाठबळ, सर्वोतोपरी सहकार्य होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर विभागप्रमुख, प्राध्यापकांनी कार्य करावे, असे आवाहनही कुलगुरुंनी केले होते.

हेही वाचा : होय! एमआयटीचे तीनशे विद्यार्थी घेतायत ई ग्रंथालयाचा लाभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांनी प्रकल्प सादर केले. दिनदयाळ उपाध्याय कौशल केंद्राचे संचालक डॉ. महेंद्र सिरसाठ यांनी चार प्रकल्प सादर केले. यामध्ये ऑटोमेटेड सॅनिटायजर डिस्पेंसर (टच फ्री) व ऑटोमेटेज सॅनिटायजर बूथ ही दोन उपकरणे साकारण्यात आली आहेत. एक डिस्पेंसर निर्मितीचा खर्च चारशे रुपयांच्या आसपास आहे. मोठ्या प्रमाणात निर्मिती केल्यास हाच खर्च निम्म्यात येईल.

हेही वाचा : थेट कोरोना बाधितांच्या वाॅर्डातुन, असा आहे रुग्णांचा दिनक्रम

डीएसटी - एसटीआय हब अंतर्गत कन्नड तालुक्यातील सहा गावे दत्तक घेण्यात आलेली आहेत. या गावांसह गरजू सर्वांना डिस्पेंसर वितरित करण्यात येतील. नृसिंह ग्रुपचे दिलीप धारूरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.

पोस्ट कोविड १९ प्रकल्प राबवा : कुलगुरु
‘कोवीड-१९’ नंतरच्या काळात विविध उपाय योजना, प्रकल्प राबविणे गरजेचे असून विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोध्र विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. हॅण्ड सॅनीटायझर, मास्क आणि व्हेन्टीलेटर निर्मितीचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यापीठ काम करेल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BAMU Made A Hand Free Sanitizer Dispenser