एसबीआय वगळता सर्व बॅंकांचे आज व्यवहार बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

केंद्राविरोधात देशव्यापी संपामुळे बुधवारी (ता.8) विविध बॅंका आणि सर्व संघटना सहभागी होणार आहे. संपात एसबीआयवगळता सर्व बॅंका सहभाग नोंदविणार आहेत. यामुळे एसबीआय वगळता इतर सर्व बॅंकांचे व्यवहार बंद राहणार आहेत

औरंगाबाद : केंद्राविरोधात देशव्यापी संपामुळे बुधवारी (ता.8) विविध बॅंका आणि सर्व संघटना सहभागी होणार आहे. संपात एसबीआयवगळता सर्व बॅंका सहभाग नोंदविणार आहेत. यामुळे एसबीआय वगळता इतर सर्व बॅंकांचे व्यवहार बंद राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लाईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापुरकर यांनी दिली. 

क्रांती चौकात निदर्शने 
बॅंकींग क्षेत्रातील ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बॅंक एम्प्लाईज आसोसिएशन, बॅंक एम्प्लाईज फेडरेशन ऑफ इंडिया या संपात सहभागी होणार आहे. बॅंकांतर्फे क्रांती चौकातील बॅंक ऑफ महाराष्ट्रासमोर सकाळी 10: 30 वाजता निदर्शने करण्यात येतील. संघटनांनी नोंदवलेल्या सर्व मागण्यांना पाठिंबा देत असतानाच बॅंक कर्मचारी संघटना पुरेशी नोकर भरती, नवीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नोकर भारती, नवीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना , पेन्शन योजनेतील सुधार तसेच बॅंक एकत्रीकरणाला विरोध करत आहेत. या निदर्शनानंतर सकाळी अकरा वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्‍त कार्यालय दरम्यान होणाऱ्या मोर्चात बॅंकेचे कर्मचारी सहभाग घेणार असल्याचेही श्री. तुळजापुकर यांनी सांगितले. 

अरे बाप रे -  प्रेमविवाहानंतरही पत्नीचे तुकडे-तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये, तिच्यासाठी धर्मही बदलला होता  

आजच्या संपात एलआयसीच्या संघटना सहभागी 
 केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा व घेत असलेल्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आज बुधवारी (ता.8) देशभरातील सर्व कामगार संघटनांनी व इतर संघटनांनी एक दिवसाच्या लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. संपात भारतीय आयुर्विमा महामंडाळातील विविध संघटना सहभागी होणार आहे. 

जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? 

भारतीय आयुर्विमा महामंडळ आपला निधी मोठ्या प्रमाणात भारतीय अर्थव्यस्थेत गुंतवून तिला बळकटी देण्याचे काम करीत आहे. एलआयसीतील पगारवाढ 2017सालापासून प्रलंबित असून अंशदायी निवृत्ती वेतनयोजना मोडकळीस काढून जुनी पेन्शन योजना सुरू करावी आदी मागण्यांसाठी देशव्यापी संपात एलआयसी संघटना सहभागी होत रस्त्यावर उतरणार आहे. 

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

यामध्ये विमा कामगार संघटना, भारतीय विमा कर्मचारी सेना, ऑल इंडिया इन्शुरन्स एम्पॉलाईज असोसिएशन, आयएनटीयुसी या संघटनांचा समावेश आहे. आज बुधवारी मोर्चा क्रांतीचौकातून निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

जाणून घ्या मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

देशव्यापी संपात भारतीय कामगार सेनेचाही सहभाग 
 केंद्र सरकाच्या कामागार कर्मचारी कष्टकारी यांच्या विरोधी धोरणाविरुद्ध बुधवारी (ता. आठ) होणाऱ्या संपात भारतीय कामगार सेनाही पूर्ण ताकदीशी सहभाग घेत संप करणार आहे. यासंदर्भात शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या आदेशाने सर्व कामागार संपात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे मराठवाडा विभागाचे चिटणीस प्रभाकर मते पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank Strike on January 8 in Aurangabad