भाजपचे नेते एकमेकांबद्दल काय सांगतात, वाचा

प्रकाश बनकर
रविवार, 26 जानेवारी 2020

राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्यानंतर सर्वत्र अनेक बदल होताना दिसून येत आहेत. यातून अनेकजण सत्ताधारी आघाडीच्या मार्गावर आहेत, तर पक्षांतर्गत गटबाजीही आता समोर येऊ लागली आहे. 

औरंगाबाद : राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्यानंतर सर्वत्र अनेक बदल होताना दिसून येत आहेत. यातून अनेकजण सत्ताधारी आघाडीच्या मार्गावर आहेत, तर पक्षांतर्गत गटबाजीही आता समोर येऊ लागली आहे. 

औरंगाबादेत शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष पदांच्या निवडीवरून नाराजीनाट्य रंगात आले आहे. सोमवारी (ता.27) होणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या उपोषणाबद्दल माहिती घेण्यासाठी भाजपने शुक्रवारी (ता. 24) पत्रकार परिषद घेतली. भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांना टाळून ही परिषद घेण्यात आल्याने नव्याने वाद उद्‌भवला आहे. 

बापरे - इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना ठणकावले

शहरात हे उपोषण होणार असल्याने त्याच्या संयोजनाची जबाबदारी शहराध्यक्षांवर देण्यात आली आहे. मात्र पत्रकार परिषदेला शहराध्यक्षांनाच बोलावले नाही. विशेष म्हणजे, ते शहरात असतानाही बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. 

धक्कादायक - या कारणांनी खालावत आहे शुक्राणूंची गुणवत्ता

पक्षाचे आमदार अतुल सावे यांनाही ऐनवेळी फोन करून बोलविण्यात आले. यामुळे पक्षातली गटबाजी समोर आली आहे. याबरोबरच बजाजनगर आणि कन्नड येथील मंडळ अध्यक्षांच्या निवडीसाठी बोलविण्यात आलेली बैठकीही ऐनवेळी रद्द करण्यात आली. 

काय म्हणाले, शहराध्यक्ष तनवाणी? 

"मी शहरातच होतो. पक्षातर्फे पत्रकार परिषदे घेण्यात आल्याचे तुमच्याकडूनच कळले. याविषयी मला वरिष्ठांकडून कुठलीच कल्पना देण्यात आलेली नव्हती. पंकजा मुंडे यांच्या उपोषणानिमित्ताने वॉर्डनिहाय बैठकांचे मी नियोजन करत आहेत. पत्रकार परिषदेविषयी कुठलीच माहिती मला देण्यात आली नाही,'' असे किशनचंद तनवाणी यांनी स्पष्ट सांगितले. दरम्यान पत्रकार परिषदेच्या स्थळी तनवाणी येऊन गेले होते. तरीही त्यांना पत्रकार परिषद घेणार असल्याची खबरही लागू दिली नाही. 

हेही वाचा एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

काय म्हणाले आयोजक? 

पत्रकार परिषदेत आयोजक शिरीष बोराळकर आणि डॉ. भागवत कराड यांना याबद्दल विचारले असता, डॉ. कराड यांनी शहराध्यक्ष तनवाणी मुंबईत असल्याचे सांगितले. बोराळकर यांनीही हेच उत्तर दिले. प्रत्यक्षात तनवाणी औरंगाबादेतच होते. असे असतानाही त्यांना टाळण्यात आले असल्याचीही चर्चा शहरात सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Internal Problems Aurangabad Breaking News