औरंगाबादेत भाजपचे प्रवीण घुगे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल

मधुकर कांबळे
Wednesday, 11 November 2020


भाजपचे मराठवाडा विभागीय संघटनमंत्री राहिलेले प्रवीण घुगे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातुन जोडले गेले आहेत. सध्या ते राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बुधवारी (ता.११) पदवीधरसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

औरंगाबाद : मला पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या त्यामुळे मी मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे असे प्रवीण घुगे यांनी सांगीतले. श्री घुगे यांनी पक्षाकडे मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी केली होती. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

भाजपचे मराठवाडा विभागीय संघटनमंत्री राहिलेले प्रवीण घुगे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातुन जोडले गेले आहेत. सध्या ते राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बुधवारी (ता.११) पदवीधरसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यानंतर बोलताना ते म्हणाले, पक्षाकडे मी उमेदवारी मागितली होती. पक्षाने उमेदवार जाहीर केलेला असला तरी मलाही उमेदवारी दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी उमेदवारी दाखल केली आहे. पक्षाकडून जो निर्णय येईल तो मला मान्य राहिल. गेली बारा वर्ष पदवीधरांना न्याय न देणाऱ्यांचा पराभव करणे हे एकमेव लक्ष आहे. पदवीधर मतदारसंघात विजय खेचून आणण्यासाठी पक्षाची एकसंघ ताकद आम्ही उभी करू आणि नक्की विजय प्राप्त करू असा विश्वास व्यक्त केला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Praveen Ghuge filed nomination papers Aurangabad news