औरंगाबादेत चलनातून बाद नोटांचा प्रचंड मोठा साठा सापडला

मनोज साखरे
Tuesday, 21 January 2020

रिक्षातील शेख उमर शेख गुलाम नबी नोटांचा गठ्ठा घेऊन पळायला लागला. परंतू पोलिसांनी त्याला पकडले. याचदरम्यान शेख मोईन शेख मूनीर (वय 35, रा. कांचनवाडी) सय्यद अझहरुद्दीन सय्यद अहेमद (रा. इंदीरानगर) यांनाही पकडले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे हजार व पाचशे रुपयांच्या चलनातून बाद झालेले एकूण 25 लाख 80 हजार रुपये सापडले. 

औरंगाबाद - नोटाबंदीनंतर चलनातून जुन्या सर्व नोटा रिझर्व्ह बॅंकेत जमा झाल्या. हा समज औरंगाबादेतील कारवाईमुळे खोटा ठरला. शंभर-दोनशे नव्हे, तर तब्बल 25 लाख 80 हजारांच्या चलनातील बाद झालेल्या नोटा औरंगाबादेत जप्त करण्यात आल्या. 

ही कारवाई मंगळवारी (ता. 21) करण्यात आली. यापुर्वी औरंगाबादेत सप्टेंबर 2019 ला एक कोटींच्या चलनातून बाद नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. नोटाबंदीनंतर देशभरात जुन्या नोटा बॅंकांमार्फत गोळा करण्यात आल्या होत्या; परंतु त्यानंतरही चलनातून बाद झालेल्या नोटा औरंगाबादेत सापडल्याने चर्चेला उधान आले आहे. 

याविषयी गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक मधूकर सावंत यांनी माहिती दिली. कटकटगेट भागात तीनजण रिक्षा क्रमांक (एमएच 20, बीटी 9760) मधून चलनातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी नेल्या जात होत्या. ही बाब गुन्हेशाखा पोलिसांना समजली. त्यानंतर कटकटगेट भागात गुन्हेशाखा पोलिसांनी गस्त वाढवून संशयित रिक्षाला अडविले. 

पोलिस असल्याची जाणीव होताच रिक्षातील शेख उमर शेख गुलाम नबी नोटांचा गठ्ठा घेऊन पळायला लागला. परंतू पोलिसांनी त्याला पकडले. याचदरम्यान शेख मोईन शेख मूनीर (वय 35, रा. कांचनवाडी) सय्यद अझहरुद्दीन सय्यद अहेमद (रा. इंदीरानगर) यांनाही पकडले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे हजार व पाचशे रुपयांच्या चलनातून बाद झालेले एकूण 25 लाख 80 हजार रुपये सापडले. 

या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. त्यांनी नोटा कूठून आणल्या, त्या बदलल्या जात होत्या का याविषयी पोलिस तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी कायदेशिर पंचनामा केला आहे. नोटांची वाहतूक करणाऱ्या तिघांनाही कायदेशिर नोटीस देण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजार राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. 

यापुर्वी पकडले एक कोटी 
गोपाल टी हाऊस, उस्मानपुरा परिसरात शब्बीर शहा नामक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे तब्बल 99 लाख 65 हजारांच्या नोटा सापडल्या होत्या. 

नोटा जप्त करून शब्बीर शहाची चौकशी केली तेव्हा या नोटा औरंगाबादेतील मोहम्मद नईम मोहम्मद इब्राहिम (वय 45, रा. कटकटगेट) व मोहम्मद इलियास मोहम्मद युनूस (वय 38, रा. सब्जीमंडी) यांना देण्यासाठी आणल्याचे त्याने सांगितले होते. यानंतर पोलिसांनी या दोघांनाही पकडले होते. 

हेही वाचा - 

एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

 नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

 याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

 चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking News 26 Lakh Notes Seized In Aurangabad