औरंगाबादेत आणखी तीन पॉझिटीव्ह, कोरोनाबाधीतांची संख्या ५६ वर 

मनोज साखरे
Monday, 27 April 2020

पंचकुवॉ व नुर कॉलनी या भागात दोनजण कोरोनाबाधित आढळल्यानंतर महापालिकेने या भागातील रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील ७१ जणांना क्वारंटाईन केले आहे. यासर्वांचे स्वॅब घेण्यात आले असून, अहवाल येईपर्यंत त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

औरंगाबाद ः कोरोना विषाणू आणि त्यापासून होणाऱ्या कोविड-१९ या आजाराचा धोका औरंगाबाद शहरात वाढत आहे. रविवारी (ता. २६) चार महिलांना कोविड- १९ विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चिंता वाढतच असून सोमवारी (ता. २७) पुन्हा तीन जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे रुग्णसंख्या ५६ वर गेली आहे.

शहरातील भिमनगर भावसिंगपुरा येथील १६ वर्षीय मुलगी, ६५ वर्षीय किलेअर्क येथील महिला आणि नूर कॉलनी येथील पाच वर्षीय मुलाची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे आता शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५६ वर पोचली असुन यात २३ जण कोरोनामुक्त २७ जणांवर उपचार सुरु असुन ६ जणांचा मृत्यू झालेला आहे.

औरंगाबादेत रविवारी सकाळी आसेफिया कॉलनीतील ३५ वर्षीय महिला आणि समतानगर येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्या दिवशी सायंकाळी दौलताबाद येथील ५३ वर्षीय महिला आणि आसेफिया कॉलनी येथील ३९ वर्षीय महिलेची कोविड-१९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे रविवारी चार व सोमवारी तीन असे दोन मिळुन दिवसांत सात रुग्णांची भर पडली आहे.

पंचकुवॉं, नूर कॉलनीतील ७१ जण क्वारंटाइन 

पंचकुवॉ व नुर कॉलनी या भागात दोनजण कोरोनाबाधित आढळल्यानंतर महापालिकेने या भागातील रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील ७१ जणांना क्वारंटाईन केले आहे. यासर्वांचे स्वॅब घेण्यात आले असून, अहवाल येईपर्यंत त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सोमवारी किलेअर्क परिसरातील पंचकुवॉं भागात ६० वर्षीय महिलेचा घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या महिलेच्या संपर्कात आलेले मुले, मुली, सुना, नातवंडे यासह अत्यंत जवळचे नातेवाईक व शेजारी अशा सुमारे ४५ जणांना महापालिकेतर्फे ताब्यात घेऊन क्वारंटाईन करण्यात आले. तसेच नुर कॉलनीतील व्यक्ती ७० वर्षीय असून, तो देखील संपर्कात आल्याचे आढळून आले.

या व्यक्तीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता कोरोना बाधित निघाला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाने सुमारे या भागातील २६ जणांना क्वारंटाईन केले आहे. रुग्णांच्या संपर्कातील ७१ व्यक्तींना ताब्यात घेण्यात येऊन त्यांचे स्वॅब घेतले, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी 

पंचकुवॉं भागातील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे कळताच जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी भागाला भेट देऊन पाहणी केली. हा भाग सील करण्याची कारवाई सुरू केली असून, काळा दरवाजा ते नाला दरम्यानचा रस्ता सील केला जाणार आहे. शेजारच्यांची तपासणी करण्यासाठी त्यांना क्वारंटाईन होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking News Three more positives in Aurangabad