बस-दुचाकीची धडक, दोघे चुलत भाऊ जागीच ठार, सिल्लोड तालूक्यातील घटना.   

सचिन चोबे 
Friday, 13 November 2020

औरंगाबाद- जळगाव महामार्गावरील डोंगरगाव फाट्यालगतच्या हरिओम जिनिंगजवळ दुर्घटना, एक युवक गंभीर जखमी  

सिल्लोड (औरंगाबाद) : भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने दोघे जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. औरंगाबाद- जळगाव महामार्गावरील डोंगरगाव फाट्यालगतच्या हरिओम जिनिंगजवळ शुक्रवार (ता.१३) दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतात एकाच घरातील दोन चुलत भावांचा समावेश आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अक्षय सुरेश पायघन (वय.२१), कृष्णा अशोक पायघन (वय.१७) व किरण संतोष बोडखे (वय.१९) हे दिवाळीनिमित्त खरेदीसाठी रहिमाबादहून (ता.सिल्लोड) सिल्लोडकडे निघाले होते. त्यावेळी पुढे जाण्याच्या प्रयत्नात सिल्लोडहून जळगावकडे भरधाव जाणाऱ्या एसटी बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीचा चुराडा झाला. अक्षय पायघन व कृष्णा पायघन हे चुलतभाऊ चिरडले गेल्याने जागीच ठार झाले. किरण बोडखे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून औरंगाबादेतील रुग्णालयात पाठविण्यात आले. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घटनास्तळी पाहणी केली. उपजिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर दोघांचे करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. उपनिरिक्षक पी. पी. इंगळे तपास करीत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राखीव पोलिस दलात निवड, पण... 
दिवाळीच्या काळातच पायघन कुटूंबातील दोघा तरूणांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. अक्षय पायघनची केंद्रिय राखीव पोलिस दलात नुकतीच निवड झाली होती. परंतू काळाने त्याच्यावर झडप घातली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus-two wheeler accident two cousins ​​killed