अझहरुद्दीनवर का झाला गुन्हा दाखल... कुणाला फसवले : वाच

मनोज साखरे
Thursday, 23 January 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्यावर औरंगाबाद पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आणखी दोन जणांची नावे पुढे आली आहेत. या तिघांनी आपली २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. 

औरंगाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्यावर औरंगाबाद पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आणखी दोन जणांची नावे पुढे आली आहेत. या तिघांनी आपली २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. 

विविध देशांच्या प्रवासासाठी विमानाची तिकिटे काढून देतो असे सांगत मोहम्मद अझहरुद्दीन आणि इतर काहीजणांच्या नावे अझहरुद्दीनच्या स्वीय सहायकांनी तिकीटे बुक केली. या प्रवासाची रक्कम ऑनलाईन हस्तांतरीत करण्याचे आश्‍वासन देत दानिश टुर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी मालकाची वीस लाख 96 हजार 311 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात अझहरुद्दीन यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन, सुदेश अव्वेकल, मुजीब अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी औरंगाबादेतील मोहम्मद शहाब मोहम्मद याकूब (वय 49, रा. लेबर कॉलनी, औरंगाबाद) यांनी तक्रार दिली. त्यांची दानिश टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी आहे.

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS

मोहम्मद शहाब यांना आठ नोव्हेंबर 2019 ला सायंकाळी त्यांचा परिचित व क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांचा स्वीय सहायक मुजीब (रा. बेगमपुरा) यांचा कॉल आला. तिकीट बुक करायचे, असे सांगून तिकीट शुल्क खात्यात ऑनलाईन जमा करतो असे म्हणाला. यानंतर त्यांनी सुदेश नामक व्यक्तीकडे फोन दिला.

सुदेश यांच्या सांगण्यानुसार नऊ नोव्हेंबरला शहाब यांनी दोन टिकीटे बुक केली. ही तिकीटे मोहम्मद अजहरुद्दीन यांचे मुंबई-दुबई पॅरीस फ्लॉईटचे एकूण 7 लाख 23 हजार 990 रुपयांचे टिकीट होते. मुजीब यांना तिकीटाच्या पैशांबाबत मोहम्मद शहाब यांनी विचारल्यानंतर पैसे देतो, असे सांगून बॅंक खात्याची माहितीही मागितली. त्यानुसार शहाब यांनी खात्याची माहिती दिली.

पुन्हा पुन्हा काढली तिकिटे

नंतर पुन्हा 9 नोव्हेंबर 2019 ला मुजीबचा पुन्हा कॉल आला व अजून दोन तिकीटे बुक करायचे सांगितले. त्यामुळे मोहम्मद शहाब यांनी 98 हजार 400 रुपयांची तिकीटं बुक केली. 10 नोव्हेंबरला तिसऱ्यांदा मोहम्मद शहाब यांना मुजीबचा कॉल आला व अझहरुद्दीन व इतरांची पॅरीस ते टॅरीन प्रवासाची येण्या-जाण्याची तिकीटे बुक करायचे सांगत सुदेशशी बोलून घ्या, असे तो म्हणाला.

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

शहाब यांनी सुदेशशी संपर्क केला असता त्यांनी अजय सिंग यांचे कोपनहेगन-एमस्टरडम तिकीट बुक करण्याचे मोहम्मद शहाब यांना सांगितले. या तिकीटांची एक लाख सत्तर हजारांची रक्कम सुदेशला मोहम्मद शहाब यांनी मागितली. पण आपण सध्या घाईत आहोत, मुजीबशी बोला, असे त्याने सांगितले. मुजीबला कॉल केल्यानंतर विश्‍वास ठेवा पैसे देतो, असे तो शहाब यांना म्हणाला. यानंतर सुदेशने परत शहाब यांना संपर्क साधत आणखी पाच लोकांची तिकिटे बुक करायची सांगितले. 

खात्यात पैसेच जमा झाले नाही.. 

11 नोव्हेंबरला सुदेशने पुन्हा शहाब यांना कॉल करुन इकडे मोठा अपघात झाला फ्लाईट वेळेवर मिळणे शक्‍य नाही, असे सांगून पाच तिकीटे रद्द करुन पुन्हा नव्याने बनवा मी पैसे अकाऊंटला पाठवितो, असे सांगितले. क्रुशिया नॅशनल बॅंकेमार्फत स्विफ्टमार्फत सुदेशने 13 हजार 500 युरो पाठविल्याचे सांगितले, पण पैसे शहाब यांच्या खात्यात जमा झाले नव्हते. 

शहाब यांची अखेर पोलिस ठाण्यात तक्रार
 
खात्यात पैसे जमा न झाल्याने शहाब यांनी पैसे मागितले, तेव्हा विदेशातून आल्यानंतर पैसे देतो असे सुदेशकडून सांगण्यात आले. विश्‍वास ठेवून शहाब यांनी सुदेशच्या सांगण्यानुसार अजून काही तिकीटंही बुक केली. तिकीट व रद्दीकरण शुल्क मिळून मोहम्मद शहाब यांना वीस लाख 96 इहजार 311 रुपये संशयितांकडून मिळालेच नाही. त्यामुळे मोहम्मद शहाब यांनी तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी उपनिरीक्षक ए. डी. नागरे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Registered Against Mohammed Azruddin Cricket Breaking News