नव्या कृषिविधेयकाने शेतीचे उत्पन्न दुप्पट होईल : रावसाहेब दानवे यांचा दावा

मधुकर कांबळे
Saturday, 3 October 2020

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणुन संसदेमध्ये कृषिविषयक विधेयके मंजूर करण्यात आली. याबाबत रावसाहेब दानवे यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली. 

औरंगाबाद : संसदेने मंजुर केलेली कृषि विधेयके हे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी फायदेशीरच ठरणार आहे. मात्र राजकीय हेतुने प्रेरीत होऊन कॉंग्रेस व त्यांचे मित्रपक्ष शेतकऱ्यांची दिशाभुल करत आहे, अशी  टिका या विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
संसदेच्या सभागृहात शेतीविषयक विधेयके मंजूर करण्यात आली. यानंतर या विधेयकाला वेगवेगळ्या पक्ष-संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. या पार्श्‍वभुमीवर केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांनी शनिवारी (ता.तीन) पत्रकार परिषदेत ही टिका केली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणुन संसदेमध्ये कृषिविषयक विधेयके मंजूर करण्यात आली. लोकसभेत काही चालले नाही आणि लोकांसमोर जाण्यासाठी काही मुद्दा नसल्याने कॉंग्रेस आणि मित्रपक्षांनी या विधेयकाला विरोध करायला सुरूवात केली असल्याची त्यांनी टिका केली. लोकांमध्ये जाण्यासाठी त्यांना एखादा मुद्दा हवा होता. या माध्यमातुन शेतकऱ्यांमध्ये अपप्रचार करण्यात येत आहे. मात्र या विधेयकाला विरोध करणारे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरविण्यात यशस्वी होणार नाहीत असा दावा करत शेतकऱ्यांनी चिंता करू नये.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सरकार त्यांचा शेतमाल हमीभावानेच खरेदी करेल अशी ग्वाही दिली. हाथरस येथील सामुहिक अत्याचाराच्या प्रकरणी त्यांनी चौकशी समितीच्या चौकशीचे कारण पुढे करत अधिक भाष्य करणे टाळले. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, शहराध्यक्ष संजय केनेकर, प्रवक्ते शिरिष बोराळकर, अनिल मकरिये, प्रविण घुगे आदी उपस्थित होते. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central minister Rao saheb Danve press conference