मुख्यमंत्री ठाकरे कॅप्टन; मला संकटकाळी एका जागी बसवत नाही : शरद पवार

sharad pawar.jpg
sharad pawar.jpg

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवून आहेत. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत ते प्रत्येक जिल्ह्यातील आढावा प्रशासकीय यंत्रणेकडून घेत आहे. याकाळात ते कॅप्टनची भूमिका निभावत आहेत. कॅप्टनला निर्णय तातडीने घेता येणार आहे. यातून ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्याची पुर्तता करण्याचे काम करत असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा शरद पवार यांनी शनिवारी (ता.२५) पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हाधिकरी कार्यालयात शनिवारी खासदार शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, फलोत्पादमंत्री संदीपान भुमरे, खासदार इम्तियाज जलील, खासदार डॉ. कराड यांच्यासह लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाची कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

शरद पवार म्हणाले की, राज्य आणि देशावर आलेल्या या कोरोनाच्या संकटाला आपण एकत्रितपणे सामोरे गेलो, तर त्यावर निश्चितच मात करू शकतो. देशात महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि दिल्ली यांची स्थिती चितांजनक आहे. तर राज्यात मुंबई, पुणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे, नाशिक, औरंगाबाद येथील स्थिती चिंतेची आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर कमी करणे हे आपले उदिष्टय आहे. लोकांचा सहभाग आणि सहकार्य मिळाले तर हे निश्चितच शक्य आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढेल असे तज्ञांचे मत आहे.  जर असे झाले तर अधिकचे बेड वाढवावे लागणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने त्याची तयारी करून ठेवावी. जेणेकरून कुणीही उपचारापासून वंचित राहणार नाही. औरंगाबादचा रुग्णवाढीचा दर कमी झाला असला तरी काळजी घेणे गरजेचे असल्याचेही श्री. पवार म्हणाले.

तुम्ही वयाच्या ८० व्या वर्षी देखील राज्यभरात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी फिरत आहात. मुख्यमंत्री मात्र मुंबईत बसून असल्याची टिका विरोधकांकडून केली जाते. या प्रश्नावर पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे काम उत्तम सुरू आहे असे सांगत विरोधकांच्या टिका खोडून काढली. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतच बसून परिस्थिताचा आढावा घेणे आवश्यक आहे. ते निर्णय तातडीने घ्यावे, असे आमचे ठरले आहे. कोरोनाच्या संकट काळात उद्धव ठाकरे हे सकाळपासून रात्री उशीरापर्यंत राज्यातील संपुर्ण परिस्थिचा आढावा पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेकडून घेत असतात.

यातून ज्या त्रुटी किंवा कमतरता जाणवतात त्यावर निर्णय घेऊन तातडीने प्रशासकीय यंत्रणेला आदेश देऊन ते सोडवण्याचे काम ते मुंबईत बसून करत आहेत. कोरोनाच्या संकटात लोकांनी सण, उत्सव घरातच साजरे करत राज्य सरकारच्या सूचना व नियमांचे पालन केले. यात मुस्लिम सामाजाने रमजान ईद घरीच साजरी करत एक आदर्शच निर्माण केला. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोठी मदत झाली. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांनी यामध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडल्याचेही श्री. शरद पवार यांनी सांगितले. 

संकटकाळी एका जागी बसवत नाही

मी लोकांमध्ये रमणारा माणूस आहे. राज्य व देशावर जेव्हा संकट येते तेव्हा मला एका जागी बसवत नाही. संकटाच्या काळात अनेक लोकांनी मला मदत केली आहे. या लोकांच्या संकट काळात मी इकडे आलो आहेत. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी फिरत असतो. आजचा दौरा हा कोरोनाच्या संकटात केंद्राशी संबंधित काही प्रश्न असतील तर ते जाणून घेण्यासाठीचा आणि ते दिल्लीत मांडण्यासाठीचा आहे. आजच्या आढावा बैठकीतून जे प्रश्न समोर आले आणि ज्याचा संबंध केंद्राशी आहे. ते मी, डॉ. कराड आणि इम्तियाज जलील तीनही खासदार मिळून केंद्रासमोर सांगू. असेही शरद पवार यांनी सांगितले.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  
बाहेर गेलेला कामगार परत आणण्याचा प्रयत्न
कोरोनामुळे उद्योगावर संकट आले आहेत. यामुळे राज्य सरकार उद्योगमंत्री हे आर्थव्यस्था पर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एवढेच नव्हे तर सुरू करण्यासाठी इंडस्ट्रीतून बाहेर निघून गेलेल्या कामगारांना परत कसा येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत असेही शरद पवार म्हणाले.

(संपादन- प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com