बाल कर्करोग दहा वर्षांत दुप्पट

gmch aurangabad
gmch aurangabad

औरंगाबाद - लहान मुलांतील कर्करोग दहा वर्षांपुर्वी साडेतीन टक्के होता त्याचे प्रमाण आज सात ते आठ टक्के झाले आहे. भारतात दरवर्षी पन्नास हजार नव्या बाल कर्करोग रुग्णांची नोंदणीचे प्रमाण आहे. यात अर्धेअधिक रक्ताचा तर उरलेले सॉलीट ट्युमरचे रुग्ण आढळतात. त्याच्या उपचारात किमोथेरपीमुळे पांढऱ्या पेशी कमी झाल्याने जंतूसंसर्गाची शक्‍यता वाढते. नव्या उपचार पद्धती वापरुन जंतूसंसर्ग रोखण्याला यश मिळवल्यास मृत्यूदर कमी करणे शक्‍य असल्याचे मत बालकर्करोग विभागप्रमुख डॉ. अदिती लिंगायत यांनी मांडले. 

राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम-प्रात्यक्षिक ही बाल कर्करोग तज्ज्ञांची कार्यशाळा औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटना व कॅनकिड या एनजीओच्या सहकार्याने शुक्रवारी (ता. 24) शासकीय कर्करोग रुग्णालयात पार पडली. डॉ. तुषार इधाटे, डॉ. श्रद्धा चांडक, डॉ. बादिरा, डॉ. आदिती लिंगायत, डॉ. राकेश आजमेरा यांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात विविध केस स्टडी आणि प्रात्यक्षिकही दाखवण्यात आली.

कार्यशाळेचे उद्घाटन प्रभारी अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांच्या हस्ते करण्यात आले. कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, बालरोग संघटनेच्या अध्यक्ष डॉ. रेणू बोराळकर, डॉ. अनिल वाघमारे, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. प्रभा खैरे, डॉ. ऋता बोरगांवकर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. तृप्ती जोशी, डॉ. संगिता पाटील यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन डॉ. नाझनिन यांनी तर आभार डॉ. पुजा तोतला यांनी मानले. या कार्यशाळेसाठी डॉ. फारुख, डॉ. अमित, डॉ. मयुरी, डॉ. निला, डॉ. शिल्पा, कॅनकीडच्या डॉ. धनश्री प्रधान, प्रज्ञा कळसे, विकास सुर्यवंशी, अजय देवकाते, विनोद घाटे यांनी पुढाकार घेतला. 

क्‍यूअर रेट 70 टक्‍क्‍यांनी वाढला ः डॉ. बादिरा

बदलत्या जगात जनरल फिजिशियन्सनी आपली निरिक्षणशक्ती आणखी तीव्र करण्याची गरज आहे. त्यामुळे लवकर निदान शक्‍य होईल. नव्या व अद्ययावत उपचार पद्धतीने बाल कर्करोगाचा 70 टक्‍यांनी क्‍युअर रेट वाढला आहे. त्यात बाल कर्करोग रुग्णांना मदतीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहे.

त्यामुळे लवकर निदान त्यानंतर उपचाराला सुरुवात आणि शेवटपर्यंत उपचार गरजेचा आहे. दरम्यान, कुटुंबांना आहार, त्या रुग्ण मुलांच्या शिक्षणाबद्दल जागरुक करुन मानसिक व सामाजीक आधार देणेही तितकेच गरजेचे आहे. असे मत मुंबई टाटा इस्टीट्युटच्या बाल कर्करोग तज्ज्ञ डॉ. बादीरा यांनी व्यक्त केले.

दोन वर्षात अडीच हजार बाल कर्करुग्णांची नोंदणी

कर्करोग रुग्णालय सुरु झाल्यापासून बालकांचे उपचार घाटीत बालरोग विभागात होत होते. मात्र, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी इथेच स्वतंत्र बालकर्करोग वॉर्ड सुरु केला. आता इतर राज्यातूनच नव्हे तर देशाबाहेरुन रुग्ण येत आहेत. गेल्या दोन वर्षात अडिच हजार नव्या बाल रुग्णांची नोंदणी या विभागात झाली. तर येमेनसह गुजरात आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशातील रुग्णांचाही यात समावेश असल्याचे डॉ. अरविंद गायकवाड म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com