हर्सूल तलावाच्या सांडव्यात बुडून बालकाचा मृत्यू, तरुणाने वाचवले दोघांचे प्राण

1drown_
1drown_

औरंगबाद: गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे हर्सूल तलाव ओसंडून वाहत आहे. पोलिसांनी आणि महापालिकेने सुरक्षारक्षक नेमलेले असतानाही छुप्या मार्गाने तलावाकडे पोहण्यासाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी तलावाच्या सांडव्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीनपैकी एका बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

तर एका स्थानिक तरुणाने दोघांना पाण्याबाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. ही घटना दुपारी एकच्या सुमारास सारा वैभवच्या पाठीमागे असलेल्या सांगळेवाडीजवळ घडली. रामेश्वर विजय साठे (१३, रा. राजनगर-चेतनानगर) असे मृत बालकाचे नाव आहे.

यंदा पावसाचा जोर वाढल्याने १३ वर्षानंतर पहिल्यांदाच ऐतिहासिक हर्सूल तलाव तुडूंब भरला आहे. त्यामुळे त्याचा सांडवा ओसंडून वाहत आहे. मागील काही दिवसांपासून नागरिकांनी तलावाभोवती गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि महापालिका प्रशासनाने अनेकदा नागरिकांना तेथून हुसकावून लावले. वेळप्रसंगी पोलिसांना बळाचा वापर देखील करावा लागला. तरीही पाण्याचा मोह नागरिकांना आवरेनासा झाला आहे. यापूर्वी देखील हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या अनेक बालक व तरुणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे महापालिकेने सुरक्षेसाठी आता कर्मचारी नेमण्याचे ठरवले होते. मात्र, मंगळवारी राजनगर- चेतनानगरातील तीन बालके दुपारी पोहण्यासाठी गेले होते.

अखेर नाविलाज झाला....

घेही सारा वैभवच्या पाठीमागे असलेल्या सांगळेवाडीनजीकच्या वाहणाऱ्या सांडव्याच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही गटांगळ्या खाऊ लागले. त्यावेळी जवळच असलेल्या करण शिंदे या तरुणाला मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्याने पाण्यात उडी घेतली. तेव्हा तिघांपैकी दोघांना वाचविण्यात यश आले.

त्याने दोघांना पाण्याबाहेर काढले. मात्र, रामेश्वर हा खड्ड्यात फसल्यामुळे त्याचा बराचवेळ करणला शोध लागला नाही. अखेर करणने या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळवली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी रामेश्वरचा पाण्यात उतरुन बराचवेळ शोध घ्यायला सुरूवात केली. त्यावेळी खड्ड्यात अडकलेल्या रामेश्वरला पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

(संपादनः सुषेन जाधव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com