बाप मारतो म्हणून मुलीने गाठला रेल्वे रुळ, पुढे देवासारखे धावले पाटील काका ! 

सुषेन जाधव
Tuesday, 22 September 2020

काळ आला पण वेळ नव्हती, दोघांचेही वाचले प्राण 

औरंगाबाद :  ‘ती’चा दहावीत असतानाच बालविवाह झालेला. लग्नानंतर दोन मुलं पदरात टाकून तीन वर्षात पतीने आत्महत्या केली. संसार उघड्यावर पडल्यानंतर ती सासूला घेऊन माहेरी आली. हिला शिक्षणाची मोठी हौस. बारावी केली, नर्सिंगला प्रवेशही घेतला, पण व्यसनी बापाच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाणीला एक दिवस कंटाळली.

बापलेकीचे कडाक्याचे भांडण झाल्यानंतर जीव देते म्हणत रेल्वे रुळ जवळ केला. अगदी त्याच वेळेला रेल्वे आली. ती रुळाकडे धावतही निघाली. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती या म्हणीनुसार पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील (काका) यांनी तीचा जीव वाचविला. ही घटना सोमवारी संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ घडली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

आशा (नाव बदललेले आहे) ही दहावीत असतानाच तिचा बालविवाह झाला. पतीने आत्महत्या केल्यानंतर दोन मुले, सासूंसह शहरातील इंदिरानगर येथे ती माहेरी आली. आशाला शिक्षणाची खूप आवड. तीने बारावी केली, नर्सिंगला प्रवेशही घेतला. इंटरशीप सुरुही झाली. सगळं आलबेल सुरु असताना मात्र तिला व्यसनी वडीलांच्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. दारु पिऊन चारित्र्यावर संशय घेऊन ते तीला रोज मारहाण करत असत. एक दिवस कोणीतरी तीच्या वडीलांना तुमची मुलगी लग्न करुन पळून गेल्याचे सांगितले, त्यावरुन वडीलांनी ती काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली, तिथे तीला काम करताना पाहिले. मात्र घरी आल्यानंतर पून्हा संशय घेऊन मारझोड सुरु केली. तिला होत असलेल्या त्रासाबद्दल सर्व नातेवाईकांत समजले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान कन्नड तालूक्यातील नातेवाईकाने शहरात येऊन वडिलांना समजावून सांगितले. तसेच नातेवाईक वापस जात असताना पून्हा बापलेकींचे कडाक्याचे भांडण झाले. यात वडील अन मुलगी दोघेही जीव देतो म्हणाले. त्याचवेळेस मुलगी आशा ही संग्रामनगर उड्डाणपुलाकडे गेली. नातेवाईकांना लवकर लक्षात आले नाही, त्यांनी रेल्वे पटरीकडे धाव घेतली. दरम्यान तिथे श्रीमंत गोर्डे पाटील यांनी मुलीला पाहिले. मात्र आशा बोलत नव्हती.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुकी समजून तिच्याशी गोर्डे पाटलांनी इशाराऱ्याने बोलले. अचानक तीने बोलायला सुरु करत आपबीती त्यांच्याजवळ कथन केली. तीची समजून घालत असतानाच आशा मात्र मला जीव द्यायचाय या विचारावर ठाम होती. तितक्यात रेल्वे आल्याने एकच धावपळ उडाली. पोलिस ठाण्याशी संपर्क करताच जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी धाव घेतली. पोलिस निरीक्षक संतोष पाटील, एपीय वायदंडे यांनी आशा, तिचे वडील यांची समजूत घातली आणि चांगली वागणूक देण्याची समज देऊन घरच्यांच्या हवाली केले. यावेळी चेतन हिवराळे, राहुल साळवे यांनी सहकार्य केले.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patil Uncle saves life when the daughter reaches the railway tracks due to the father's troubles