सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी दीपा मुधोळ-मुंडे रुजू 

दुर्गादास रणनवरे
Tuesday, 15 September 2020

  • बुलढाणा जिल्हा परिषदेत कार्यरत असतांनाही केली विशेष कामगिरी. 
  • उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. तेथून त्यांची बदली सिडको नवी शहरे औरंगाबाद या पदावर झाली आहे. 

औरंगाबाद : सिडको नवीन शहरे औरंगाबाद येथील मुख्य प्रशासक पदाची सूत्रे नुकतीच दीपा मुधोळ मुंडे (भा.प्र.से.)  यांनी सिडकोचे मावळते मुख्य प्रशासक एच. पी. तुम्मोड (भा.प्र.से.) यांच्याकडून ती स्वीकारली दीपा मुधोळ या मुख्य प्रशासक पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. तेथून त्यांची बदली सिडको नवी शहरे औरंगाबाद या पदावर झाली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यापूर्वी त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे व  शिक्षण आरोग्य स्त्रीभ्रूणहत्या या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. एप्रिल १७ पासून त्या औरंगाबाद येथील राज्य जीएसटी विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होत्या. जीएसटी प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. ई वे बिल नियमाचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर कर वसूल केला होता. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जीएसटी विभागातून डिसेंबर २०१८ मध्ये त्यांची उस्मानाबाद जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती. एक कर्तव्यदक्ष आणि धडाडीच्या अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनामध्ये ख्याती आहे. सिडकोचे मावळते मुख्य प्रशासक आणि प्रभारी प्रशासक प्रगती चौंडेकर यांनी दीपा मुधोळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कार्यकारी अभियंता बी.एम. हिवाळे, सहाय्यक वसाहत व पणन अधिकारी गजानन साटोटे,सहाय्यक पणन अधिकारी राजर कुरे, सहाय्यक वसाहत अधिकारी अस्मिता विरशीद , लेखाधिकारी महेश करमपुरी तसेच सिडकोचे अधिकारी व कर्मचारी यांचे यावेळी उपस्थिती होती.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CIDCO New Chief Administrator Deepa Mudhol Munde appointed