महिला डॉक्टर प्रकरण; 'घाटी'च्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करा : जिल्हाधिकारी

मनोज साखरे
Sunday, 4 October 2020

महिला डॉक्टर प्रकरणानंतर प्रशासन जागे.
जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांची रुग्णालयाला भेट. 

औरंगाबाद : घाटी येथे कार्यरत निवासी महिला डॉक्टरवर झालेल्या गैरप्रकारानंतर जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांनी घाटी रुग्णालयात भेट दिली. यावेळी डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने करून घाटीच्या सुरक्षेत वाढ करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांच्यासह जिल्हाधिकारी यांनी घाटी रुग्णालयाच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेतील पीडित निवासी महिला डॉक्टरची भेट घेतली. यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्यासह इतर संबंधित उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी घाटी परिसरातील घटनास्थळाची पाहणी करून एनआरएच महिला वसतिगृहाला भेट दिली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशासन सर्व डॉक्टर आणि पीडित यांच्या पाठीशी असून यापुढे असे प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी यांनी घाटीतील डॉक्टर, कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना तत्परतेने करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले. मार्डच्या शिष्टमंडळाने यावेळी निवेदन देऊन घाटीमध्ये टवाळखोरांवर कारवाई करावी, होस्टेलची आणि परिसरातली भिंतीची उंची वाढवावी, सोशलवर्करच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्यांना रोखावे, पोलिसांची पेट्रोलिंग वाढवावी आदी मागण्या करण्यात आल्या. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collectors order GMCH Increase the security Aurangabad news